सावनेर येथे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सामूहिक धरणे आंदोलन.

50

सावनेर येथे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सामूहिक धरणे आंदोलन.

सावनेर येथे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सामूहिक धरणे आंदोलन.
सावनेर येथे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सामूहिक धरणे आंदोलन.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी,मो.नं-9822724136

सावनेर-23डिसेंबर2021
सावनेर तहसील परिसरात तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कार्यालयाच्या चाव्या जमा करून सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मा. तहसीलदार यांना लेखी अर्ज देण्यात आला.
विदर्भ पटवारी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर, जिल्हा शाखा नागपूर यांनी नागपूर जिल्हा प्रशासनास हिंगणा तालुक्यातील तलाठी तिवारी व मंडळ अधिकारी राजेश चुटे यांना मतदार यादीत अनियमितता झाल्याच्या कारणावरून केलेल्या चुकीच्या व अन्यायकारक निलंबनाविरोधात जिल्हाधिकारी यांना आंदोलनाची नोटीस दिलेली होती.सदर नोटिसीला जिल्हा प्रशासनाने अद्याप दाद न दिल्याने नागपूर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झालेला असून या सर्व प्रकाराला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याची जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांची भावना झालेली आहे.त्यामुळे आंदोलनाच्या तिसरा टप्पा प्रमाणे आज दिनांक 23 डिसेंबरला सावनेर तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयाच्या चाव्या तालुका जमा केलेले आहेत तसेच सामूहिक रजेचा अर्ज सविनय सादर करण्यात आला.
तालुका प्रशासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यात तीव्र भावना जिल्हा प्रशासनामार्फत शासनास पोहोचवण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.
तलाठी व मंडळ अधिकारी त्यांचे निलंबन मागे न घेतल्यास आंदोलन असेच सुरू राहणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी यांनी दिली.