रामदेव बाबा सॉल्व्हन्ट कंपनीमुळे लगत असलेल्या उदापुर गावांमध्ये होतेय प्रदुषण

63

रामदेव बाबा सॉल्व्हन्ट कंपनीमुळे लगत असलेल्या उदापुर गावांमध्ये होतेय प्रदुषण, उपविभागीय अधिकारी यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन

रामदेव बाबा सालवंट मुळे लगत असलेल्या उदापुर गावांमध्ये प्रदुषण उपविभागीय अधिकारी यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन
रामदेव बाबा सालवंट मुळे लगत असलेल्या उदापुर गावांमध्ये प्रदुषण
उपविभागीय अधिकारी यांना गावकऱ्यांनी दिले निवेदन

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
95454600

ब्रम्हपुरी:- रामदेव बाबा सॉल्वंट प्रा.लि. ब्रम्हपुरी व्दारा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे नियमाला न जुमानता प्रदुषणाचे मोठे वातावरण तयार केलेले आहे. सदर कंपनीमध्ये धानाच्या कोंडया व कुक्कुसा पासुन खादय तेल तयार करण्यात येते. सदर प्रक्रियेदरम्यान कोडयांची राख हवेत मिसळुन उदापुर, गावात लहान मुले, महिला, वृध्द महिला व पुरुष या सर्व लोकांच्या कपडयांवर, घरावर, लोकांच्या डोळयामध्ये जावुन जीवघेणी व पीडादायक रोग निर्माण होत आहे.याकरिता उदापुर येथील सरपंच सोनू उर्फ प्रभाकर नाकतोडे, उपसरपंच योगेश तुपट यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी जी. प. चंद्रपूर,मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार ,मुख्यधिकारी नगर परिषद ब्रह्मपुरी, तहसीलदार यांना निवेदन दिले..

सदर कंपनीचे दुषीत पाणी कोणत्याही प्रकारची प्रकिया न करता सार्वजनिक भुती नाल्यामध्ये सोडण्यात येते, त्यामुळे त्या नाल्याचे संपूर्ण पाणी प्रदुषीत झालेले आहे. त्यामुळे गावातील व परीसरातील जनावरांनी सुध्दा पाणी पिने बंद झालेले आहे. तसेच नाल्यावर ग्रामपंचायत उदापुर ची पाणीपुरवठा योजनेची विहीर आहे व त्यावरून गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गावामध्ये नियमित केला जातो. त्यामुळे गावामध्ये गावकऱ्यांच्या
आरोग्य नेहतीच बिघडत असतात व त्याचे वाईट परीणाम आता सुध्दा गावांमध्ये दिसत आहेत. रामदेव बाबा सॉल्वंट प्रा. लि. व्दारा ब्रम्हपुरी ते बोरगाव गावाच्या अगदी सार्वजनिक रस्त्याच्या बाजुला तयार करण्यात आलेली आहे. उदापुर गावातील विद्यार्थी शिक्षणाकरीता रोज ब्रम्हपुरी येथे ये-जा करतात. कंपनीला रोज मोठ-मोठया ओव्हरलोडेड ट्रकांमधुन त्याच रस्त्याने वाहतुक करतात. रस्ते अरुंद असल्यामुळे व ओवरलोडेड ट्रक मुळे अपघात होउन जिवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रामदेव बाबा सॉलवंट प्रा. लि.ब्रम्हपुरी व जवळील भुती नाल्याची तसेच गावाची योग्य चौकशी व पाहणी करून संबंधित कंपनी मालकावर उचित ती कार्यवाही करून आम्हाला व जवळील गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा.अशी मागणी निवेदनात उदापुर ग्रामपंचायतचे सरपंच सोनू उर्फ प्रभाकर नाकतोडे, उपसरपंच योगेश तुपट,विजय नाकतोडे, दिवाकर तूपट,रोशन बेदरे, युगल नागदेवते, धनू नाकतोडे, रुपेश उरकुडे, व अन्य गावकरी उपस्थित होते.