मैत्री आठवणी ग्रुप तर्फे स्नेहमिलन सोहळा सम्पन्न

58

मैत्री आठवणी ग्रुप तर्फे स्नेहमिलन सोहळा सम्पन्न

मैत्री आठवणी ग्रुप तर्फे स्नेहमिलन सोहळा सम्पन्न
मैत्री आठवणी ग्रुप तर्फे स्नेहमिलन सोहळा सम्पन्न

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- मैत्री आठवणी ग्रुप तर्फे ने. हि. उच्च माध्यमिक ब्रम्हपुरी १९९2-९३ वर्ग १२ वी बैच च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा नगरसेवक नितीनजी उराडे आणी वर्गशिक्षक मा प्रा. राम दोनाडकर सर यांच्या उपस्थितीत ग्रीनलँड रोप वाटिका येथे दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती प्रा.राम दोनाडकर सर यांनी अध्यक्षीय भाषणात माणसाने स्वतःशी प्रामाणिक आणी नियमाने जगले तर जीवनात उच्चत्तम शिखर गाठण्यास त्यांना कुणीही अडवू शकत नाही असे मत व्यक्त केले तर नितीनजी उराडे यांनी देव देव खूप ऐकलं पण माणसातील खरा देवमाणूस सरांनमध्ये आम्हाला दिसला असे भावनिक प्रतिपादन केले. शिल्पा घाटबांधे हिने शाल व श्रीफळ देऊन सरांचा सन्मान केला १९९३ बॅच च्या सर्व विदयार्थ्यांनी सरांना पुष्प्गुच्छ देऊन स्वागत करीत आशीर्वाद घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कुमरे व अजय कऱ्हाडे यांनी करीत “मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा” असतो असे भाव व्यक्त केले. रात्रीच्या थंडगार गारव्यात अनिल निनावे यांनी झिंग झिंग झिंगाट गाण्यावर डान्स करून वातावरण ऊबदार केले.जवळ जवळ २५ वर्षां नंतर सर्व मित्र एकत्र आले,आणी जुन्याआठवणी ना उजाळा आला असे भाव शिल्पा घाटबांधे हिने व्यक्त केले. ममता राऊत, संजय बुर्ले, विलास शेंडे, अरविंद भटारकर , राजू शिवनकर, शैलेश बिलगय्या , संजय मांढरे, प्रेमा राऊत, माधुरी कडू, कल्पना आमले , सुचिता गाडगीळवार, सतीश तासकर, अनिता उराडे, स्वाती राऊत, या सर्वांनी कार्यक्रमाला यशस्वितेकडे नेण्यास मोलाचे सहकार्य केले. लई आणी अरविंद यांचा जन्मदिवस असल्यामुळे दोनाडकर सरांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांनाही प्रेमरूपी आशीर्वाद दिले.स्नेहमीलन सोहळ्याला यशस्वी करण्यात राहुल सातपुते आणी पन्ना कुक यांचे बहुमूल्य योगदान लाभले.

“दुःख अडवायला उंबऱ्यासारखा
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.. ! ह्या कवितेनी कार्यक्रमाची सांगता झाली.