वर्धा कापसाला फुटले कोंब; शेतकरी हवालदील

58

वर्धा कापसाला फुटले कोंब; शेतकरी हवालदील

पावसाने सोयाबीन गेले, आता कापसाला तोडणीच्या कापसाला फुटले कोंब. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी झाले हवालदिल.

प्रतिनिधी
वर्धा:- यंदाच्या वर्षी सततच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असुन, सोयाबीन पिकाच्या पाठोपाठ आता कापुस पीक पण होतच्या नव्हतच्या दारात उभ आहे.
शेतक-याने शेतात कापसाची लागवड केली होती सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने पाहाणी असल्याने पिकाची वाढ व फुले बोंडे बऱ्याच पैकी होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पिकांची परिस्थिती बघितल्यावर भरघोस उत्पन्न होईल असे वाटत होते. परंतु सप्टेंबर महिन्यात आलेल्या सततच्या पावसाने उभ्या फुटलेल्या कापसाच्या पिकाला चांगलाच फटका बसवला व त्यामुळे कापुस शेतातच पडायला लागला.

अशातच सम्पुर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने आणि हवामान खात्याकडून पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने या  शेतकऱ्यांनी घावपड करत वेचणी करीता मजुर आणले व शेतातील कापसाची वेचणी केली. वेचणी अंती त्यांना कापसाचे चांगले उत्पन्न झाले व त्यांनी ह्या कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने कापुस घरी भरुन ठेवला. परंतु कापसाला घरीच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्पादकांची अडचण लक्षात घेता राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भरीव शासकीय मदत जाहीर करावी अशी मागणीही शेतकरी कैलास देवतळे व गणेश लढी यांनी केली आहे. हीच परिस्थिती जर पुन्हा काही शेतकऱ्यांनवर येण्याची वेळ असून हवालदिल शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे असे सांगण्यात येत आहे.