नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्या!
अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष
समितीचे मुख्यमंत्र्यांना
निवेदन
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी :-भंडारा जिल्हातिल नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदानाची घोषणा निवडणुकी आधी केली होती. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना सदर अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांचे विद्यत बिल अद्यापही माफ झाले नाही याकरीता मुख्यमंत्र्यांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. __महाराष्ट्रात सत्तेत येण्यापूर्वी महाविकास आघाडीने घोषणा केली होती की नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रूपये जमा करण्यात येतील असे सांगितले होते.मात्र दोन वर्षाचा कार्यकाळ होऊन महाविकास आघाडी शासनाने ईमानदार व नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये दिले नाही. त्यातच विद्युत विभागाव्दारे मिटरची तपासणी न करता अव्याढव्य विद्युत बिल पाठविले जात आहे. शेतकरी कर्ज बाजारी झाला असून आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर निर्माण आली आहे. शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रकार मोठया प्रमाणात विद्युत विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला असून पुढे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत शासनाने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ५० हजार रूपयाची रक्कम देण्यात यावी तसेच थकबाकी असलेले विद्युत बिल माफ करण्यात यावे असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या मार्फत अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, उपाध्यक्ष कोठीराम पवनकर, विष्णुदास लोणारे, पुरूषोत्तम गायधने, सुरज निखाडे यांनी मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.मागणी पूर्ण न झाल्यास नाईलाजास्त लोकशाही मार्गाने जिल्ह्याभर आंदोलन करू असे नमूद केले आहे