• भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी २७ डिसेंबर पासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनावर बसणार : कॉ.रामलाल बिसेन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी:-भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २७ डिसेंबरपासून भंडारा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणावर बसणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे (आयटक) जिल्हा सहसचिव कॉ.रामलाल बिसेन सिहोरा यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. • शासनाच्या विविध व जन कल्याणकारी योजना राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी आज दारिद्री नारायणाचा अवतार म्हणून जगत आहेत.ग्रामपंचायत कर्मचारी यांना मिळणारे वेतन अल्प प्रमाणात असूनही वर्षानुवर्ष या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही.शासनाने मंजूर केलेला राहणीमान भत्ता व वेतनातून कपात झालेली भविष्य निर्वाह निधी सुद्धा अनेक वर्षापासून त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही अशा तक्रारी सुद्धा संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत. • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी लागू करण्यात यावी व त्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी व इत्यादी सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी,१० ऑगस्ट२०२० चे शासन आदेश उद्योग उर्जा व कामगार विभाग अन्वये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे.तसेच ज्या ग्रामपंचायती शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नाही त्या ग्रामपंचायती विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर व विशेष भत्यावर शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे व वसुलीची अट रद्द करण्यात यावी, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम १९६० चे कलम ६१ रद्द करण्यात यावे,किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सरसकट कामावरून काढण्याच्या तरतुदीत समावेशक दुरुस्ती करण्यात यावी. • या मागण्यांच्या पूर्ततेसाठी भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही कॉ.रामलाल बिसेन यांनी केले आहे.या बेमुदत धरणे आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. शिवकुमार गणवीर, जिल्हाध्यक्ष ,कॉ.माधवराव बांते, जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके, जिल्हा सहसचिव कॉ.रामलाल बिसेन व जिल्हा कोषाध्यक्ष कॉ.गजानन लाडशे हे करणार आहेत. • या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्यामल तुरकर, जयशंकर राऊत, ओमप्रकाश मुरे, शिवराम भुतांगे, रतन झंझाड,कृष्णा डहाळे, किसन मेश्राम,संतोष शेंडे,दिलीप बोपचे, गणेश आंबेडारे,हेमराज शरणांगत, मुरलीधर उरकुडे, देवीलाल पारगी, अशोक मोहारे, रामेशर कांभारकर,जैलाल पटले,रिता बोरकर, प्रमिला पारधी,दुर्गा वनवे, सुजाता कळंबे, शारदा वाघाळे ईत्यादींनी केले आहे.महासंघाने गोंदिया येथे झालेल्या राज्य अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे राज्यात सर्वच जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचारी धरणे देणार आहेत.हे येथे उल्हेखणीय आहे.