हिंगणघाट अवैध संबधातुन झाला खुन.

57

हिंगणघाट अवैध संबधातुन झाला खुन

वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड भागातील रहिवासी अविनाश राजू फुलझेले हा 27 ऑक्टोबर पासुन घरी न आल्याने राजुच्या कुटुंबीयांनी हिंगणघाट पोलिसांना यांची माहिती दिली होती. 28 तारखेला अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोनेगाव (स्टे.) शिवारात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुरूवातीला अल्लीपूर पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम ३०२ व २०१ अन्वये गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात करण्यात आली.

मुकेश चौधरी
हिंगणघाट :- अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेगाव (स्टेशन) शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांना त्या मयतची ओरख पटविने आणी आरोपींना अटक करने ही दुहेरी जबाबदारी पाड पाडावी लागणार होती.

अविनाश राजू फुलझेले याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेगाव (स्टेशन) शिवारात एका शेतात आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अवैध संबधातुन आम्ही अविनाशला जीवानीशी ठार केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड भागातील रहिवासी अविनाश राजू फुलझेले हा 27 ऑक्टोबरला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. अशातच 28 रोजी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोनेगाव (स्टे.) शिवारात आढळून आला. या प्रकरणी सुरूवातीला अल्लीपूर पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम 302 आणी 201 अन्वये गुन्ह्या नोंदवुन घेत तपासाची चक्रे फिरवायला सुरूवात केली. याच दरम्यान पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. अशातच अविनाश सोबत आणखी दोन व्यक्तींना बघितल्या गेले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी निखील प्रभाकर ढोबळे वय 28 वर्ष व सुधीर उर्फे चेतन दिलीप जवादे वय 35 वर्ष यांना टाकळी आणि हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता या दोन्ही संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एम. एच. 32 ए.ए. 0205 क्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोहवा संतोष दरगुडे, गजानन लामसे, शेख हमीद, रंजीत काकडे, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, राजेश जैसिंगपुरे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, गोपाल बावणकर, मनिष कांबळे, नवनाथ मुंडे, अमोल ढोबळे, प्रदीप वाघ यांनी केली. आरोपींना अल्लीपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.