पीरिपाचे शहराध्यक्ष अरुण गजभिये व नागपूर शहर दक्षिण पश्चिम चे अध्यक्ष एड. अरुण महाकाळे यांना सर्वपक्षीया तर्फे वाहली श्रद्धांजली.
✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
नागपुर:- गेल्या 40 वर्षांपासून अरुणजी गजभिये व एडवोकेट अरुणजी महाकाळे हे आंबेडकरी चळवळीमध्ये नामांतराच्या आंदोलनापासून कवाडे सरांच्या सोबत सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्य करीत होते. परंतु 1 डिसेंबरला अरुणजी गजभिये यांना हृदयाचा झटका आला . त्याच प्रमाणे 5 डिसेंबर पहाटेला एडवोकेट अरुणजी महाकाळे यांना हृदय झटका आला. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आणि म्हणून सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम इंदोरा नागपुर येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पी आर पी चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, साहित्यिक इमो नारनवरे गुरुजी व आंबेडकरी चळवळीचे अनेक नगरसेवक, रिपब्लिकन पार्टीचे बाळू घरडे, रिपब्लिकन पार्टीचे नेते अमृत गजभिये, दिनेश अंडरसहारे, अरुण वाहने, संजयजी बडोदेकर अनेक आंबेडकरवादी पक्ष नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचालन बाळूमामा कोसमकर तर आभार प्रदर्शन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नागपूर शहर कार्याध्यक्ष कैलासजी बोंबले यांनी केले.