नागपूर जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस

59

नागपूर जिल्हातील कळमेश्वर व नरखेड तालुक्यामध्ये गारपीट सह पाऊस.

नागपूर जिल्हातील कळमेश्वर व नरखेड तालुक्यामध्ये गारपीट सह पाऊस.
नागपूर जिल्हातील कळमेश्वर व नरखेड तालुक्यामध्ये गारपीट सह पाऊस.

✒युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपूर:- जिल्ह्यातील कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील अनेक भागात काल जोरदार पाऊसाच्या सरीसह गारपीट झाले. त्यामूळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याची महिती पुढे येत आहे.

नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात दोन दिवसांचा ऑरेंज अलट हवामान खात्याकडुन देण्यात आला होता. या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर नरखेड तालुक्यात अवकाळी पावसाचा गारपीट झाले आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहरात धुके पसरलेले होते. सायंकाळी सहा वाजता दाट धुके असल्यामुळे सर्वत्र अंधार होता सूर्यास्तानंतर धुके हळूहळू कमी झाले. सकाळी दहा वाजल्यानंतर ऊन तापायला लागल्याने धुक्याचा प्रभाव कमी झाला त्यानंतर दुपारपर्यंत उन सावलीचा लपंडाव सुरू होता. परंतु दुपारी तीन वाजता नंतर पुन्हा आभाळ दाटून आले व आभाळात काळे ढग दाटून आले शहरात सायंकाळी पाच वाजताचा सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली सुमारे दीड तास पाऊस पडल्याने रिपरिप पाऊस सुरू होता.

नरखेड मध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू होता. दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान तालुक्‍यातील काही भाग गारपीट आणि चांगला झोपून काढला. तसेच कळमेश्वर तालुक्यात सायंकाळी पाच वाजता सुमारे दहा ते पंधरा मिनिटात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या, तर काटोल मध्ये अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. त्याचप्रमाणे पिकाचे व भाजीपाल्याला जोरदार फटका बसला आहे यामध्ये गहू हरभरा तुरी व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.