गावासाठी कायमस्वरूपीचा ग्रामसेवक न मिळत असल्याने ग्रामपंचायत सदस्या मिराबाई परदेशी यांचा ईशारा,

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067/9860884602
दि: 28/12/2021 : मिराबाई इंदल परदेशी (सदस्य ग्रा.पं.शिंदाड) यांनी म. गट विकास अधिकारी पंचायत समिती ता.पाचोरा जि. जळगाव यांना शिंदाड गावास कायम स्वरुपि ग्रामसेवक मिळणे बाबतचे निवेदन देऊन ग्रामसेवक न मिळाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार असल्याचे कळविले आहे,
निवेदनात म्हंटले आहे की, दि.२७ डिसे. २०२१ रोजी आमची माहे डिसेंबरची मासिक सभा होती. परंतु कार्यालयात ग्रामसेवक हजर नसल्यामुळे आमची मीटिंग होऊ शकली नाही. शिंदाड येथे दि. ०१/०८/२०२१ ते आज पर्यंत म्हणजे ४ महिण्या पासुन कायम स्वरूपीचा ग्रामसेवक हजर नाही. तात्पुरते ग्रामसेवक म्हणुन श्री. जि.के नन्नावरे ‘भाऊसाहब काम पाहत आहेत परंतु ते आम्हाला पुर्ण वेळ देवु शकत नाही. १४ वा वित्त आयोगाचे काम पुर्ण पणे खोळंबले आहेत, गावातिल लोकांचे देखिल बरेच कामे थांबलेले आहेत. कोणतेही काम करण्यासाठी गावातिल लोकांना पुर्ण आठवडा भर ग्रामसेवकाची वाट पहावी लागते त्या मुळे गावातील लोकांना खुप अडचणी येताय व लोकांना विणाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपण लवकरात लवकर ३१ डिसेंबर च्या आत नविन ग्रामसेवक दिला नाहि तर, माझ्या ग्रामस्थांसमवेत दि. ०२ जानेवारी 2022 ला शिंदाड ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार असल्याचे म्हंटले आहे,