चंद्रपूर महानगर भाजपा जैन प्रकोष्ठ द्वारा विदर्भ विभागीय बैठक

60

चंद्रपूर महानगर भाजपा जैन प्रकोष्ठ द्वारा विदर्भ विभागीय बैठक

चंद्रपूर महानगर भाजपा जैन प्रकोष्ठ द्वारा विदर्भ विभागीय बैठक
चंद्रपूर महानगर भाजपा जैन प्रकोष्ठ द्वारा विदर्भ विभागीय बैठक

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट चंद्रपूर जिल्हा तर्फे विदर्भ विभागीय बैठक गुरुवार दि. २३/१२/२०२१ ला चंद्रकांता सेलिब्रेशन येथे पार पडली. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख सौ. ईशाताई कोळेकर, चंद्रपूर महानगर भाजपा अध्यक्ष मा श्री डॉ मंगेशजी गुलवाडे, उपमहापौर चंद्रपुर मनपा मा श्री राहुलजी पावडे, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौ अंजलीताई घोटेकर, नगरसेवक व चंद्रपूर भाजपा महामंत्री श्री सुभाषभाऊ कासंगोट्टुवार, भाजपा महानगर सचिव मा श्री मनोजजी सिंघवी, सकल जैन समाजाचे महासचिव मा श्री अमरजी गांधी, महाराष्ट्र भाजपा जैन प्रकोष्ठचे सहसचिव मा श्री निर्भयजी कटारिया, विदर्भ विभाग महिला प्रमुख सौ. सपना कटारिया, महानगर भाजपा जैन प्रकोष्ठ चे जिल्हाध्यक्ष श्री हेमंतराजजी सिंघवी, महिला अध्यक्ष सौ अर्चनाताई मुणोत सह जैन समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात सौ. ईषाताई कोळेकर यांनी जैन समाजाच्या महिलांना फक्त सामाजिक नव्हे तर राजकीय क्षेत्रात सुद्धा मजल मारण्यास प्रेरित केले. देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशातल्या महिलांच्या उत्थानासाठी वेगवेगळ्या योजना विषयी त्यांनी माहिती दिली. बैठकीला मार्गदर्शन करताना भाजपा महानगर अध्यक्ष मा श्री डॉ मंगेश गुलवाडे यांनी कोरोना काळात चंद्रपूर जैन समाजाचा द्वारे केलेल्या विभिन्न सामाजिक कार्याची भरभरून स्तुती केली व चंद्रपूर महानगर जैन प्रकोष्ठ कार्यकारिणी द्वारे असेच विभिन्न कार्य करत राहण्यासाठी प्रेरित केले. सदर बैठकीला उपमहापौर मा श्री राहुलजी पावडे व भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौ अंजलीताई घोटेकर त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात चंद्रपूर महानगर कार्यकारिणी व महिला कार्यकारिणी घोषित करण्यात आली. महानगर उपाध्यक्ष पदी श्री अभिषेक कांष्टीया, श्री देवेंद्र डगली, विशाल मुथा, महासचिवपदी श्री रोहन शहा, श्री सचिन जैन, श्री अनिल बोथरा, सहसचिवपदी निर्मल भंडारी, निखील डहाले, कार्यकारिणी सदस्य पदी श्री त्रिशूल बंब, श्री आनंद तालेरा, श्री प्रतीक कोठारी, श्री पलाश सिंघवी, श्री रिषभ सकलेचा, श्री प्रशांत भलगट, श्री चेतन झांबड, श्री महावीर बोथरा,व श्री रुषभ पुगलिया यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला अध्यक्ष पदी सौ अर्चना मुणोत, महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ. अनिता अमरजी गांधी, सौ शोभा परार्थ तालेरा, जिल्हा सचिव पदी सौ राजश्री शैलेंद्र बैद, सौ वंदना राहुलजी गोलेच्छा, सहसचिवपदी सौ शितल देवेंद्रजी डगली, सौ प्रवीणा योगेशजी तालेरा, तसेच कार्यकारणी सदस्य पदी सौ. शोभा हरीशजी मुथा, सौ. दिशा रोहनजी शाह, व सौ. नैना पंकज मुथा यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमात कु. आयुशी विवेक जैन चा सत्कार सौ इशाताई कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवी श्री अमर जी गांधी, संचालन सौ सीमा प्रवीनजी गोठी तर आभार प्रदर्शन श्री हेमंतराज सिंघवी यांनी केले.