कर्ज बाजारीपणाला कंटाळून महिला शेतकऱ्यांनी राहत्या घरी घेतला गळफास (विसापूर येथील घटना)

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपुर :- सविस्तर वृत्त असे आहे की पतीने कर्जबाजारीने शेती विकली. मात्र कर्जाचा डोंगर कमी झाला नाही. कुटुंब सांभाळतांना पत्नीची ओढतान होत होती. अशातच तीने बचत गटाकडून तिने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्जाची उचल केली. कर्जाची परतफेड करण्यासाठी तिला वडिलांकडून मिळालीलेली शेतजमीन विकण्याचा बेत घरी चर्चेत आला. हा घाव तिच्या जिव्हारी लागला. या विवंचेत घरी कोणीच नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. संध्या छत्रपती टोंगे ( ४५) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचे नाव आहे. तिच्या अकाली मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ वक्त केली जात आहे.
संध्या टोंगे हिच्या पश्चयात पती, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. संध्या हिचा पती छत्रपती टोंगे हा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दलाल म्हणून कार्य करत होता. या व्यवसायात त्याला अंदाज न आल्याने तो कर्जबाजारी झाला. त्याने उचल केलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वडिलोपार्जित शेत जमीन विकली. मात्र घरची परिस्थिती सुधारली नाही. पत्नी संध्या हिने पतीची दैना दूर व्हावी म्हणून बचत गट व अन्य लोकांकडून कर्ज उचल करून कुटुंबाचा गाढा पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशातच संध्या हिला वडिलांकडून मिळणारी जमीन विकण्याची चर्चा घरी झाली. कर्जाच्या ओझ्याखाली आपली सगळी शेत जमीन विकण्याची वेळ आपल्यावर येत आहे. ही विवंचना संध्या हिच्या जिव्हारी लागली. अशातच तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. कुटुंबाला सावरताना तिने आत्मघताचा दुर्दैवी निर्णय घेतल्याने गावात हळहळ वक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा विसापूर औट पोलीस चौकीचे जमादार जीवन पाल, दुष्यन्त गोडबोले,घनश्याम साखरकर यांनी केला.