sambhaji-maharaj-smarak-vadhu-budruk
sambhaji-maharaj-smarak-vadhu-budruk
छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक येथील स्मारकासाठी १५० कोटी मंजूर

सिद्धांत
१ जानेवारी २०२२: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 24 विधेयके संमत करण्यात आली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. तीन विधेयके मागे घेण्यात आली. या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली सगळीच विधेयके महत्वाची होती. या विधेयकांपैकी शक्ती विधेयक हे ऐतिहासिक म्हणावं लागेल. या कायद्यामुळे राज्यातील माता-भगिनींची तसेच लहान मुलांची सुरक्षितता आपण निश्चित केली आहे. राज्यातल्या महिलाशक्तीला बळ देत असताना, पुरुष वर्गावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याचा समतोल साधण्याचा प्रयत्न आपण शक्ती विधेयकात केला आहे,असे उपमुख्यमंत्री अजित पवार २०२१ चे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

अधिवेशनात तीन कृषी विधेयके एकमताने मागे घेण्यात आली. अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचे विधेयक देखील महत्वपूर्ण आहे. अधिवेशनात ३१ हजार २९८ कोटी २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये, असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तशी शिफारस निवडणूक आयोगाला करण्यात येत आहे. ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षण निश्चितीसाठी, महत्वाचा असलेला इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी, पुरवणी मागण्यांद्वारे ४३५ कोटी रुपये मंजूर केले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अजित पवार यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक येथील स्मारकासाठी १५० कोटी मंजूर

छत्रपती संभाजी महाराजांचे, तुळापूर येथील स्मृतीस्थळ, वढू बुद्रुक येथील स्मारक आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे. स्मारक परिसराच्या विकासासाठी १५० कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं खर्च करणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचाही विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ बनविण्यासाठीअनेक विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. वढू बुद्रुक गावातील मुख्य प्रवेशद्वार हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या अशा दगडामध्ये बांधकाम करणे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या समाधीस्थळाच्या भिंती व बुरुज इतिहासकाळास अनुरुप अशा, त्यापद्धतीने बांधकाम करणे. मावळा’ वीर शिवले यांच्या समाधीस्थळाचा विकास करणे. समाधीस्थळांची दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी कार्यालय व बहुद्देशिय सभागृह निर्माण करणे. भक्तनिवास बांधणे. समाधीस्थळाच्या मागील बाजूस ऐतिहासिक चित्रे रंगविणे. निवडक झाडांखाली पारंपरिक पद्धतीने पार बांधणे. वढू बुद्रुक गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करणे. नाले आणि जलस्त्रोतांची सुधारणा करणे. पूल आणि बंधाऱ्यांचा विकास करणे. वढू बुद्रुक गावात वाहुकीची कोंडी सोडवण्यासाठी रिंगरोड तयार करणे. वढू बुद्रुक येथील नदीवर घाट बांधणे. समाधीस्थळाजवळ बारा बलुतेदार (गावगाडा) ग्रामीण संस्कृती प्रदर्शनातून मांडणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या निधी वाटपात अन्याय केलेला नसून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी मराठवाड्याच्या जनतेला पत्रकार परिषदेत बोलताना दिले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास व शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन.

Bhima-koregaon
भीमा कोरेगाव विजयस्तंभ

महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्यत्यागपराक्रमबलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्वस्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. कोरेगाव भीमाचा इतिहासही महाराष्ट्राच्या त्यागाचाशौर्याचापराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईत लढलेल्याशहिद झालेल्या वीरांना मी विनम्र अभिवादन करतो. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईतील  वीरांना वंदन करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींबद्दल आदर व्यक्त करून जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांनी कोरोना प्रतिबंधक नियम तसेच आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here