हा तर सत्तेचा माज-खा.सुनील मेंढे

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512046
लाखणी/ भंडारा : पोलीस ठाण्यात जाऊन आ.राजू कारेमोरे यांनी पोलिसांशी असभ्य वर्तन करीत शिवीगाळ आणि वाद घालण्याचा केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे हे वर्तन सत्तेचा माज दर्शविणारे असून समाजात वावरणाऱ्या इतर लोकप्रतिनिधींना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध नक्कीच जाब विचारला गेला पाहिजे. मात्र हे करताना आपले वागणूक लोकप्रा’तनिधीला साजेशी असावी. ज्या पोलिसा
‘च्या संरक्षणात आपण वावरतो त्यांच्याच इज्जतिची लक्तरे काढून टाकण्याचा प्रकार म्हणजे निंदणीय असाच असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या लोकप्रति निधींना सभ्यता शिका विण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया खासदार सुनील मेंढे यांनी आ.राजू कारेमोरे यांनी घातलेल्या पोलीस ठाण्यातील धिंगाण्यानंत्तर दिली.