रस्त्यावर मारहाण करणाऱ्या पोलिसांची ड्यूटी कुठे होती? आ.राजू कारेमोरे यांचा सवाल – निःपक्ष चौकशीची मागणी माता-भगिनींची मागितली जाहिर माफी . पोलिसांना शिवीगाळ करताना घसरली होती जीभ

रस्त्यावर मारहाण करणाऱ्या पोलिसांची ड्यूटी कुठे होती?

आ.राजू कारेमोरे यांचा सवाल – निःपक्ष चौकशीची मागणी

माता-भगिनींची मागितली जाहिर माफी . पोलिसांना शिवीगाळ करताना घसरली होती जीभ

रस्त्यावर मारहाण करणाऱ्या पोलिसांची ड्यूटी कुठे होती? आ.राजू कारेमोरे यांचा सवाल - निःपक्ष चौकशीची मागणी माता-भगिनींची मागितली जाहिर माफी . पोलिसांना शिवीगाळ करताना घसरली होती जीभ
रस्त्यावर मारहाण करणाऱ्या पोलिसांची ड्यूटी कुठे होती?
आ.राजू कारेमोरे यांचा सवाल – निःपक्ष चौकशीची मागणी
माता-भगिनींची मागितली जाहिर माफी . पोलिसांना शिवीगाळ करताना घसरली होती जीभ

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी/भंडारा: पोलिसांनी माझे व्यापारी मित्रांना केलेली मारहाण व कारवाई करायला वेळ लागला त्यामळे माझ्या संयमाचा बांध सुटला व नकळत माझ्या तोंडुन अपशब्द बाहेर आले. याबाबत मी माताभगिनी व सर्व जनतेची जाहीर माफी मागतो’.या सर्व घटनेची नि:पक्ष चौकशी झाली पाहिजे. मी या घटनेची निंदा करत असून, माझे चुकले असेल तर पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी. व्यापाराला अडवून रस्त्यावर मारहाण करणाऱ्या पोलिसांची ड्यूटी कुठे होती असा सवाल आमदार राजू कारेमोरे यांनी आज मोहाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.आ.कारेमोरे पढे म्हणाले माविममधील स्ट्रॉग रुम १०० मीटर लांब असताना पोलिस बाहेर आले कसे? पोलिसांनी ५० लाख रुपये व ५ तोळ्यांची सोनसाखळीची रॉबरी कशी केली? त्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती काय? रस्त्यावर येण्याचा पोलिसांचा उद्देश काय होता. पोलिसांचा पूर्वनियोजित कट होता काय, नशेत असणाऱ्या पोलिसांची ठाणेदारांनी वैद्यकीय तपासणी का केली नाही, याब्बतची शहानिशा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच, यासिन छव्वारे व त्यांच्या मित्राला पोलिसांनी नशेत तर्र राहून मारहाण केली असा आरोपही आमदार कारेमोरे यांनी केला.
सध्या भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर पोलिसांनी व्यापाऱ्याला केलेली मारहाण व पन्नास लाख रुपयाची लूट याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांनी पोलिसांना चक्क अश्लील भाषेत केलेली शिवीगाळघटनेचा व्हिडिआ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत आज आमदार राजू कारेमोरे यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या संयमाचा बांध फुटला व नकळत अपशब्द तोंडुन बाहेर पडले.याबाबत मी माताभगिनी व सर्व जनतेची जाहीर माफी मागतो अशा शब्दात आ.कारेमोरे यांनी जाहीर माफी मागितली.
व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेंनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला होता. पोलिसांनी ५० लाख रुपयांची रोख रक्कम पळविल्याची आमदार मित्रांनी पोलिसात तक्रार केली. तर पोलिसांनीदेखील आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा करत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान, पोलिसांना केलेल्या शिवीगाळचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आमदार कारेमोरे अडचणीत सापडले. आज त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले व जाहीर माफी मागितली.
रविवारी राष्ट्रवादी पक्षाचा रस्ता रोको आंदोलन असल्याचा खोडसाळपणा कोणत्यातरी कार्यकर्त्यांनी केला. तसा आमचा काही कार्यक्रम नव्हता. पण, पोलिसांनी योग्य चौकशी केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजू कारेमोरे यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, किसान सभेचे नेते माधवराव बांते व अन्य राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.