ट्विंकल इंग्लिश स्कुल, नागभीड येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्दघाटन

अरूण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि
*9403321731*
नागभीड : -भश्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा, ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड, येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आज दिनांक 03/01/2022 रोजी उद्दघाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेशजी तर्वेकर तसेच सचिव श्री. अजयजी काबरा, श्री. शामभाऊ पाथोडे, शाळेच्या प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नारनवरे इ. मान्यवर उपस्थित होते.
श्री. अजयजी काबरा यांनी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिने खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असते, खेळामुळे आपल्यातील एकाग्रता, कार्यक्षमता, सांघिकवृत्ती, खेळाडूवृत्ती वाढून आपले मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते असे मोलाचे मार्गदर्शन केले.
श्री. गणेशजी तर्वेकर आणि श्री. शामभाऊ पाथोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रिडा स्पर्धांना सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी व्हॉलीबॉल सामना, कबड्डी, खो-खो, भाला फेक, थाळी फेक, रनिंग, झिग-झॅग रेस, पोटॅटो रेस, फ्रॉग रेस, सॅक रेस, लांब उडी, स्पून ॲड मार्बल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून संपूर्ण विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी शेंडे आणि आभार सौ. सुचिस्मती बहेकर यांनी केले.