मनरेगा अंतर्गत केलेल्या कामावर न जाता बिलाची उचल
ग्रामपंचायत जनकापूरचा भोंगळ कारभार

ग्रामपंचायत जनकापूरचा भोंगळ कारभार
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड- नागभीड तालुक्यात येत असलेल्या जनकापूर ग्रामपंचायत च्या माध्यमातून ३३ कोटी वृक्षलागवड क्रार्यक्रमअंतर्गत येथील सरपंच व रोजगार सेवकाने आपल्या संबंधित कुंटूंबातील व्यक्तीला कधीही कामासाठी न पाठवता हजेरी पटावर परस्पर नावे समाविष्ट करुन बिलाची उचल केल्याने त्याच्या वर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत जनकापूर येथील नागरिकांचे वतीने करण्यात आली आहे .सन २०२१-२२ या कालावधीत ग्रामपंचायत जनकापूरच्या माध्यमातून डि.पी.विखुरलेल्या स्वरुपात ३३ कोटी अंतर्गत वृक्ष लागवड १६००रोप भाग २ जनकापूर या कामासाठी म.न.रे.गा.अंतर्गत गावातील मजूरांनी काम केले .परंतु या कामावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या कामावर न जाता जनकापूर येथील सरपंच व रोजगार सेवकाने आपल्याच कुंटूंबातील सदस्य चे नाव हजेरी पटावर सहा दिवसाचे दाखवून पैशाची उचल केली .तसेच जनकापूर येथील मामा तलाव खोलीकरण गट नं.३४८ या ठिकाणी सुध्दा कामासाठी गेलेले नसताना त्या ठिकाणी सुध्दा घरच्या लोकांना कामावर दाखवून पैशाची उचल केल्याचा आरोप जनकापूर येथील नागरिकांनी केला आहे .मात्र गावकरी वर्गाच्या वतीने संबंधित कामावर न जाता हजेरी पटावर त्यांचे नाव कसे याची माहिती सचीवाना मागितली असता जनकापूर येथील सचीवाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे .यावेळी पत्रकार परिषदेला ग्रा.प.सदस्य विलास तोडासे ,माजी तमुस अध्यक्ष आशिष गणविर,भगवान गोंडाणे,दादाजी काशीवार,नरेश बोरकर, तमुस अध्यक्ष गिरिधर बोरकर,किशोर मेश्राम व अन्य गावकरी वर्ग यावेळी उपस्थित होते .