क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी
क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी :-तालुक्यातील मुरमाडी/तुप येथील स्व.निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय कांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बी.बी.ढवळे होते.या प्रसंगी प्रा.विश्वास खोब्रागडे,प्रा.अर्चना निखाडे, प्रा.श्रीकांत भुसारी, प्रा.राहुल चुटे, प्रा.महिंद्र फुलझेले, प्रा.भुमेश्वरी वाघाये,प्रा.स्नेहा शामकुवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. अर्चना निखाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बी.बी.ढवळे यांनी ‘जेव्हापर्यंत आधुनिक भारतीय समाजात स्त्रीयांना सर्व कार्यात समानता येणार नाही तोपर्यंत सावित्रीआई फुले यांच्या कार्याचा खरा उद्देश पुर्ण होणार नाही’ असे मत व्यक्त केले. प्रा.श्रीकांत भुसारी यांनी सावित्रीआई फुले यांचे विचार व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच विचार मंचावरील प्रमुख वक्ते व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर आपले विचार प्रकट केले.
याप्रसंगी महाविद्यालयीन लिपीक खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय मेश्राम ,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे, महाविद्यालयीन शिपाई किशोरी ननोरे, अमर जांभूळकर, तेजेंद्र सदावर्ती ,शोएब शेख तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.स्नेहा शामकुवर व आभार ग्रंथपाल प्रा.विशाल गजभिये यांनी केले.