ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती च्या अनुषंगाने मुरखळा येथील माळी समाजाच्या खुल्या जागेवर भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.
✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली :- दि. 3 जानेवारी 2022 रोजी *ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती* च्या अनुषंगाने त्यांना 10:30 वा. मुरखळा येथील माळी समाजाच्या खुल्या जागेवर भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत *विनम्र अभिवादन* करण्यात आले. *कार्यक्रमाचे उद्घाटक मा.राजुभाऊ खंगार, सरपंच मुरखळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी समाज जिल्हाध्यक्ष मा.फुलचंदजी गुरनुले व प्रमुख मार्गदर्शक मा.ललिता वसाके, प्राध्यापिका महिला महाविद्यालय चामोर्शी होते.
.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व पुष्पांजली करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मा.गणेश लोनारकर, अध्यक्ष मुरखळा यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख
मार्गदर्शकांनी सावित्रीमाईंच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकले. मा.अल्का गुरनुले यांनी स्त्रियांनी समाज कार्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सदर वेळी अनेकांनी सावित्रीमाईंवर गीत सादर केले. एकाच रंगाच्या साड्या परिधान करुन काढण्यात आलेल्या रॅलीने विशेष लक्ष वेधुन घेतले. उपस्थितांच्या जेवणाची सोय करण्यात आली.
संचालन दामिना मांदाडे व आभार सौ.वैशाली यांनी केले.
सदर वेळी मुरखळा महिला अध्यक्षा मंदाताई गावतुरे व उपाध्यक्षा माया मोहुर्ले, पुरुष उपाध्यक्ष अशोक शेंडे, माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम निकोडे, नवेगाव माजी सरपंच नंदकिशोर मांदाडे, गुलशन बांबोळे, गेडाम सर, खेवले सर, मुत्तेमवार सर, तुळशिदास मोहुर्ले, नागोशे सर, महिला-पुरुष कार्यकर्ते व बांधव हजर होते .