खुनारी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीस स्थगिती
९ जानेवारी रोजी होणार होती मतदान प्रक्रिया
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी:-तालुक्यातील खुणारी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी(सहकारी निवडणूक प्राधिकरण) यांचे अखत्यारीत येत्या ९ जानेवारी २०२२ रोजी घेण्याचे ठरविण्यात आले होते.
ही निवडणूक स्थगित करण्याबाबतचा प्रत्यादेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरनाचे सचिव यांच्या आदेशानुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था खूणारी करीता नेमलेले निवडणूक निर्णय अधिकारी अनुप भांडारकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्राद्वारे निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्याचे ३१ डिसेंबर २०२१ काढलेल्या पत्राद्वारे कळविले आहे.
सविस्तर असे की,सदर निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी संस्थेचे सभासद शामराव कारू बावनकुळे व इतर २ सभासदांनी निवडणुकीतील विमुक्त भटक्या जाती/ जमाती गटातील उमेदवार विजय कटू मेश्राम याचे दिनांक २४ डिसेंबर २०२१ ला निधन झाल्याचे कळवून निवडणूक रद्द करण्याबाबत विनंती केली आहे.उक्त संस्थेचे निवडणुकीतील भटक्या विमुक्त जाती/ जमाती,विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी या मतदार संघातील उमेदवार असलेल्या विजय मेश्राम यांच्या मृत्यू बाबत खात्री करून महाराष्ट्र सहकारी संस्था
(समिती निवडणुक), नियम २०१४ चे नियम ३१ ला अनुसरून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित खुणारी र. नं. १३७२ या सहकारी संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य निवडणुकीतील भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी या मतदारसंघातील उमेदवार विजय मेश्राम यांचे २४ डिसेंबर २०२१रोजी निधन झाले असल्यामुळे संदर्भीय आदेशास अधीन राहून संस्थेच्या व्यवस्थापन समिती निवडणुकीकरिता सुरू असलेली प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याबाबत प्रत्यादेश देण्यात आला असल्याचे समजते.