अवैध दारू विक्रीने समाज स्वास्थ्य बिघडले* पालांदुर पोलिसांचे दुर्लक्ष गंभीर गुन्ह्यात झाली वाढ

*अवैध दारू विक्रीने समाज स्वास्थ्य बिघडले*

पालांदुर पोलिसांचे दुर्लक्ष

गंभीर गुन्ह्यात झाली वाढ

अवैध दारू विक्रीने समाज स्वास्थ्य बिघडले* पालांदुर पोलिसांचे दुर्लक्ष गंभीर गुन्ह्यात झाली वाढ

मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
762051204

लाखणी :-तालुक्यातील पालांदूर (चौ)परिसरात अवैध दारू विक्रीत गेल्या काही दिवसांत वाढ झाली असून यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे.गावागावांत वादावादी च्या घटनांत वाढ झाली आहे.या स्थितीत पालांदूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पालांदूर परिसर हा शांत परिसर म्हणून ओळखला जातो,परंतु गेल्या काही दिवसात या परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
गावातील अवैध दारु विक्री बंद करन्यासाठी परिसरातल्या कित्येक गावातील महिला व सामाजिक कार्यकर्ते पोलिस विभागाकडे वारंवार तक्रारी करतात तरी
यानंतर सुद्धा अवैध दारू विक्रीला पायबंद बसत नसल्याने खुद्द पोलिसांच्याच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गावातील तंटे गावातच मिटावेत यासाठी गावागावात तंटामुक्त ग्राम समित्या गठीत केल्या आहेत. परंतु या समित्या नियोजनामुळे व कार्य क्षमतेमुळे निष्क्रिय बनल्या आहेत. काही गावात तर तंटामुक्त समितीचे अध्यक्षच पोलिसांशी सलगी वाढवत अशाच प्रकारच्या अवैध धंद्यात गुंतले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात ह्याच परीसरात चोरी हाणामारीच्या गंभीर घटनांत वाढ झाली आहे वेळप्रसंगी खुनासारख्या गंभीर घटनाही घडन्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस विभागाने शांतता व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी होत आहे.