शहरातील घरकुल धारक उर्वरित लाभाअभावी त्रस्त पालकमंत्र्यानी पालकत्व स्वीकारत, घरकुलची रक्कम मिळवून द्यावी…! कूर्झा वार्ड ब्रम्हपुरी वासियांचे पालकमंत्री यांना निवेदन

शहरातील घरकुल धारक उर्वरित लाभाअभावी त्रस्त

पालकमंत्र्यानी पालकत्व स्वीकारत, घरकुलची रक्कम मिळवून द्यावी…!

कूर्झा वार्ड ब्रम्हपुरी वासियांचे पालकमंत्री यांना निवेदन

शहरातील घरकुल धारक उर्वरित लाभाअभावी त्रस्त पालकमंत्र्यानी पालकत्व स्वीकारत, घरकुलची रक्कम मिळवून द्यावी...! कूर्झा वार्ड ब्रम्हपुरी वासियांचे पालकमंत्री यांना निवेदन

क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या”घरकुल” धारक लाभार्थ्यांना तीन वर्षांचा कालावधी होऊनही योजनेची संपूर्ण रक्कम मिळाली नसल्याने.आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडलेल्या घरकुल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर लाभार्थी नगरपरिषद कार्यालयाचे उंभरठे झीजवून अक्षरशः हताश झाले असल्याने काँग्रेस कार्यकारिणीत पदाधिकारी असलेले श्री लक्ष्मणजी जिभकाटे व श्री प्रकाशभाऊ खोब्रागडे यांनी घरकुल लाभार्थ्यांचा गंभीर प्रश्न अनेक लाभार्थ्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देत न्यायिक मागणी केली आहे.

शासनाकडून लाभार्थी व्यक्तीला प्रारंभ प्रमाणपत्र देतांना असंख्य कठोर शासकीय नियमावलीच्या सूचना देत, संबंधित बांधकाम एक वर्षात पूर्ण करावे असे निर्देश असतात मात्र लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामानंतर तीन -तीन वर्ष पूर्ण लाभ मिळत नसल्याने काय करावे …? शासनाकडून गरीब लाभार्थ्यांची होतं असलेली उपेक्षा लाजिरवाणी बाब आहे.कुणी किरायाच्या घरात राहत आहेत. कुणी कर्ज काढून व्याज फेडत आहेत तर कुणी उसणवार घेतलेले पैसे कसे फेडावे या जाचात आहे. घरकुलचे पैसे मिळाल्यानंतर कर्ज चुकवू या आशेवर असलेले घरकुल लाभार्थी कोरोना सारख्या महामारीच्या संकटामुळे आर्थिक संकटात असल्याने शासनाने गरीब जनतेची अवहेलना न करता न्याय द्यावे.

घरकुल लाभार्थी असलेल्या सामान्य जनतेच्या गंभीर विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी स्व:पक्षातीलच तरुण कर्तबगार कार्यकारिणीतील पदाधिकारी व्यक्तींनी पालकमंत्री व नगरपरिषद अध्यक्षा तथा बांधकाम सभापती यांना निवेदनाद्वारे न्यायिक मागणीची अपेक्षा केली तर न्याय देण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिल्याचे म्हटले आहे. लवकरच न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सुद्धा प्रतिनिधीसह बोलतांना श्री लक्ष्मणजी जिभकाटे व प्रकाशभाऊ खोब्रागडे यांनी म्हटले आहे.