तांब्यासाठी विद्यूत ट्रान्सफॉर्मर फोडणारी टोळी अडकली पोलिसांच्या जाळ्यात

तांब्यासाठी विद्यूत ट्रान्सफॉर्मर फोडणारी टोळी अडकली जाळ्यात

धाबा पोलिसांची धडक कारवाई

तिघांना ठोकल्या बेड्या

तांब्यासाठी विद्यूत ट्रान्सफॉर्मर फोडणारी टोळी अडकली जाळ्यात धाबा पोलिसांची धडक कारवाई तिघांना ठोकल्या बेड्या

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- विद्यूत ट्रान्सफॉर्मर मध्ये शुद्ध तांबे असते हे तांबे चोरणारी टोळी चंद्रपूर जिल्ह्यात सक्रीय असल्याची गुप्त माहिती धाबा पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून चोरीच्या बेतात असलेल्या तीन चोरांना धाबा पोलिसांनी बेड्या ठोकल्या अटकेत असलेल्या पैकी एक आरोपी तेलंगणा येथील आहे ही कारवाई धाबा पोलिसांनी केली संतोष गंगाराम हूलके.. जगदीश रामचंद्र कुरेकर … सतीश सिताराम करडे असे आरोपिचे नावे आहेत

आरोपींकडून ट्रान्सफॉर्मर फोडण्याचे साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे
गोंडपिपरी तालुक्यातील किरमरी ..टोमटा सिंचन योजनेत असलेले ट्रान्सफॉर्मर फोडले त्यातील तांबे लंपास केले ही घटना 15 दिवसांपूर्वी घडली याची तक्रार सिंचन योजनेच्या कर्मचारी यांनी धाबा पोलीस स्टेशन ला दिली होती

दरम्यान 4 जानेवारी ला परत ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या चोरांची हालचाल सिंचन योजनेच्या परीसरात दिसून आली योजनेच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती उप पोलिस स्टेशन धाबा चे ठाणेदार सूशील धोकटे यांना दिली त्यावरुन पोलिसांनी सापळा रचला चोरीच्या बेतात असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली अटकेतील आरोपींकडून आरी..पाना ..निरमा पावडर..पाईप चाकू.. चारचाकी वाहन.. यांसह चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केली .. पुढील तपास धाबा पोलीस करीत आहे