अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात सहभागी व्हा- सुकेशिनी तेलगोटे
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी/भंडारा: समाजातील वाढत्या अंधश्रद्धेमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात व त्यातूनच गुन्हे घडतात. समाजाला सक्षम बनण्यासाठी समाजातील सर्व व्यक्तींनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले.
त्या भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयाची सुरुवात नवीन टाकली भगतसिग वार्ड भंडारा येथे करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योगपती ईश्वरलाल काबरा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, डॉ. संजय मानकर,अॅड.टि.एन. शेख, अॅड. के.बी. ढोमणे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, प्रा.नरेश
आंबिलकर, चंद्रशेखर भिवगडे, प्रा.युवराज खोब्रागडे, डॉ.नरहरी नागलवाडे, डॉ.प्रवीण दुलकर,डॉ. विश्वजीत थुलकर, प्रकाश नाकतोडे, संजय कटारे, भाग्यश्री कटारे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भंडाराच्या बतीने पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती निमित्त अॅड.टि.एन.शेख यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
समाजकार्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणारी कु. प्रीती निर्वाण या विद्यार्थिनीस संविधानाची प्रत व हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली, उद्घाटनपर भाषणातून जयवंत चव्हाण यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला सदैव
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ. संजय मानकर यांनी समाजाच्या उत्थानासाठी प्रत्येकाने आपले पूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून ईश्वरलाल काबरा यांनी महाराष्ट्र
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची दखल समाजात सदैव घेतली जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. युवराज खोब्रागडे यांनी केले तर आभार विष्णुदास लोणारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम कांबळे,नितेश बोरकर, कविता लोणारे सुधीर लोणारे, रॉयल लोणारे, लीलाधर बनसोड, कोठीराम पवनकर, दशरद शहारे, जोधरु राऊत, सयाबाई नेरकर, मधुबाला खोब्रागडे, गणेश कार, रुपाली लोणारे, अशोक पवनकर, विनोद भोपे,प्रीती दोनोडे, उज्जला निर्वाण,तुलशी नंदरधने, रजनी गायधने, अशोक सरावे, धर्मेंद्र बोरकर, विदिन डोंगरे, सोनू शंभरकर, चंद्रकला भोयर,वासप्पा फाये आदी मान्यवर उपस्थित होते.