bank-scams-boi-in-india
बँक ऑफ इंडियातील ६३१ कोटी रुपयांचा घोटाळा आला उघडकीस
bank-scams-boi-in-india
बँक ऑफ इंडियातील ६३१ कोटी रुपयांचा घोटाळा आला उघडकीस

सिद्धांत
६ जानेवारी २०२१: औद्योगिक यंत्र सामुग्री बनविणाऱ्या एका कंपनीने बँक ऑफ इंडियाचे तब्बल ६३१ कोटीचे कर्ज बुडवले असल्याची माहिती समोर आली आहे. कर्ज बुडवून कंपनीचे संचालक मंडळ फरार झाले आहेत.
बँक ऑफ इंडियाच्या उप महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याने सीबीआयकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, औद्योगिक कारखान्यांमध्ये लागणारे फर्नेस तेल, उष्णतारोधक यंत्रसामग्री बनविणाऱ्या कंपनीने २००७ ते २०१३ या कालावधीत ७०३.८९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण व्यवसायामध्ये या कंपनीला नुकसान झाले आणि २०११ पासून हि कंपनी तोट्यात जाऊ लागली. २०११ सालापासून कंपनीने बँकेच्या कर्जाचे हप्ते भरायचे थांबवले. अखेर २०१२ साली बँक ऑफ इंडियाने या कंपनीला ” बुडीत” श्रेणीत टाकले.

या काळात कंपनीमार्फत बँकेच्या कर्ज भरण्याच्या नोटिसांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. कंपनींच्या संचालक मंडळाकडून बँकेशी कोणताही सवांद साधण्याचा प्रयत्न झाला नाही. कंपनीच्या संचालकांनी जाणीपूर्वक कर्ज बुडविल्याचा अंदाज येताच बँकेकडून कंपनीविरोधात ६३१.९७ कोटींचे कर्ज बुडविल्याची तक्रार सीबीआयमध्ये दाखल करण्यात आली.

सीबीआयच्या प्राथमिक तपासात कंपनी संदर्भात काही माहिती समोर आली आहे. या कंपनीचे एकूण चार संचालक असून त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांच्या राजकीय ताकदीचा वापर करत बँकेतून कर्ज घेतले आणि पुढे बँकेची फसवणूक केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. तसेच या कंपनीमार्फत खोट्या नोटांची अफरातफर करणाऱ्या डीलर्स सोबत व्यवहार झाले असल्याचे उघड झाले आहे. या कंपनीचे, संबंधित संचालकांची व लोकप्रतिनिधींची नावे मात्र सीबीआयने अजून उघड केलेली नाहीत.

भारतात झाले तब्बल ७४०० कर्जघोटाळे
आरबीआयमार्फत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार २०२१ वर्षात देशाभरातील बँकांमध्ये ७४०० कर्ज घोटाळ्यांची प्रकरणे उघडकीस आली होती. यामध्ये अडकलेल्या पैशांचा आकडा हा तब्बल १.३८ लाख करोड इतका होता. यातील केवळ १ हजार करोड रुपये वसूल करण्यात भारतातील बँका यशस्वी झाल्या आहेत. याच आकडेवारीनुसार २०२१ वर्षात देशात दर दिवसाला जवळपास २२९ बँक घोटाळे घडून आल्याची चिंताजनक बातमी समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here