अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडले  अवैध रेती चोरट्यांवर गुन्हा दाखल पालांदूर पोलिसांची कारवाई

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडले 

अवैध रेती चोरट्यांवर गुन्हा दाखल

पालांदूर पोलिसांची कारवाई

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडले  अवैध रेती चोरट्यांवर गुन्हा दाखल पालांदूर पोलिसांची कारवाई

✍ मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620 512045

लाखणी:- तालुक्यातील वाहणारी एकमेव चुलबंद नदी महसूल विभागाकडून आत्तापर्यंत तालुक्यातील वाहणाऱ्या चुलबंद नदीच्या घाटांचा लिलाव झाला नाही .त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा महाउपसा रेती चोरट्यांकडून होत आहे . या रेती चोरांना वचक बसावा या उदात्त हेतूने पोलीस विभाग महसूल विभाग काम करीत आहे. पण हे अवैध रेती चोर पोलीस आणि महसूल विभागाच्या डोळ्यात धुड घालून रेतीच्या महा उपसा करीत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.पण चोर कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवस त्याची चोरी सापडली जाते असाच काहीसा प्रकार तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले विहीरगाव येथे घडला अवैध रेती उपसा करणारा चोरट्यांना रंगेहात पकडण्याचे काम दिनांक 5 जानेवारी 2022 रोज गुरवारला ला तालुक्यातील विहीरगाव येथे आरोपी चालक अमित उदाराम कठाणे(३३) याने आपल्या ताब्यातील सिल्वर रंगाच्या आईसर कंपनी चे ट्रॅक्टर त्यावर क्रमांक नसलेला ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अवैधरित्या रेती वाहतूक विना परवाना करतांना आढळून आल्याने त्याच्या ट्रॅक्टर ट्रॉली चे कागदपत्र बाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या मोबाईल मध्ये वाहनाच्या ट्रॉली चे कागदपत्रे दाखवले असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच 36 झेड 3948 तसेच ट्रॉली क्रमांक 36-8561 असे असल्याचे समजल्याने आरोपीकडून ट्रॅक्टर ट्रॉली व्यक्तीसह किंमत दोन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पालांदूर पोलीस स्टेशनला जमा करून आरोपी अमित उदाराम कठाने याच्या विरुद्ध कलम 379 भादवी सहकलम 50(1)/177 मोवाका अनव्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार तेजस सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश खूळशाम हे करीत आहेत
पण आजही रेती चोरांच्या तालुक्यातून अनेक रेती घाटामधून अवैध रेती उपसा सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे या रेती चोरट्या कोणाच्या आशीर्वाद आहे महसूल विभागाचा , पोलीस विभागाचा, एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा आशीर्वाद हात या अवैध रेती चोरट्यांवर आहे असाही प्रश्न सामान्य जनतेच्या समोर येतो .