कोविंड-19 चे लसीकरण नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्तीचे न करावे: संभाजी ब्रिगेड
✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
वाघोडा/सावनेर:- सावनेर येथे कोविंड-19 चे लसीकरण नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्तीचे न करण्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी व गट विकास अधिकारी सावनेर यांना निवेदन देण्यात आले.
प्रशासन अधिकारी वाटेल त्या मार्गाने बळजबरीने लसीकरण करण्याकरिता भाग पाडत आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये शपथ पत्रामध्ये नमूद केले की लसीकरण स्वैच्छिक असून कोणत्याही सुविधा किंवा कोणत्याही सेवा याचा लसीकरणा सोबत जोडता येणार नाही आणि असा कोणताही संबंध आम्ही जोडलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी नागरिकांना व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्तीचे करू शकत नाही. जर प्रशासकीय अधिकारी यांनी बळजबरीने लसीकरण करण्यास भाग पाडू नये. अन्यथा आम्ही संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करू कायदा व सुव्यवस्था शांतता भंग झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
संघटनेच्या वतीने निवेदन देते वेळेस दिनेश इंगोले विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, अनिल घटे, विक्रम गमे, पवन लांबट, उमेश मोरे, विनोद मानकर सीद्धार्थ मांडवे, छत्रपाल नीकोसे माजी सैनीक, राजेन्द्र आत्राम, माधवी घटे, चरपे,पालकवर्ग व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.