मेडिकलमध्ये ओबीसी आरक्षणाचे पदवीधर महासंघाने केले स्वागत

मेडिकलमध्ये ओबीसी आरक्षणाचे पदवीधर महासंघाने केले स्वागत

मेडिकलमध्ये ओबीसी आरक्षणाचे पदवीधर महासंघाने केले स्वागत

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512046

लाखणी/भंडारा :-भारत सरकारने गुरुवारी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी घोषणा केली आहे. अखिल भारतीय कोट्याअंतर्गत, 2021-2022 पासून OBC विद्यार्थ्यांना 27% आणि दुर्बल उत्पन्न गटातील (EWS) विद्यार्थ्यांना पदवी/पदव्युत्तर, वैद्यकीय आणि दंत शिक्षणामध्ये 10% आरक्षण दिले जाईल. केंद्र सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सुमारे 5,550 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

सध्याचे सरकार मागासवर्गीय तसेच EWS या दोन्ही वर्गांना योग्य आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. देशभरातील ओबीसी विद्यार्थी आता कोणत्याही राज्यातील जागांसाठी स्पर्धा करण्यासाठी एआईक्यू योजनेत या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील. केंद्रीय योजना असल्याने या आरक्षणासाठी ओबीसींची केंद्रीय यादी वापरली जाणार आहे. एमबीबीएसमधील सुमारे 1500 ओबीसी विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर शिक्षणातील 2500 विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ होणार आहे. सदर निर्णयाचे स्वागत पदवीधर महासंघाचे अध्यक्ष महेंद्र निंबार्ते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here