उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य शिबीरात 50 रुग्णांची झाली शस्त्रक्रिया

उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य शिबीरात 50 रुग्णांची झाली शस्त्रक्रिया

उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य शिबीरात 50 रुग्णांची झाली शस्त्रक्रिया

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/तुमसर:- येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबीरात भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर फारुकि रियाज यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर सचिन बाळबुधे,यांनी आयोजीत केलेल्या दोन दिवसीय आरोग्य शिबीरात डॉक्टर बाळबुधे व त्यांच्या डॉक्टरांच्या टीम ने आरोग्य शिबीरात अनेक प्रकारच्या रुग्णांची तपासणी करुन,ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता होती अशा 50 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करत त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. .त्यामध्ये लहान मुलं व वयोवृध्द,तरुण,महिला रुग्ण अशा प्रकारच्या,रुग्णांवर अंपेंडिक्स,हर्णिया,हायड्रोसिल,केंसर ची गाठ,व इतर अशा प्रकारचे आपरेशन करण्यात आले.
या करीता डॉक्टर सचिन बाळबुधे, सह डाक्टर गोपाल सार्वे ,डॉक्टर कमलेश पिल्लेवार,डॉक्टर शशिकांत मेश्राम, डॉक्टर शेखर चोपकर,यांनी सहकार्य केले.तर शिबीर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील ,नर्सेस,व सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.