मुरमाडी येथील धान खरेदी केंद्र सुरू छ.संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या मागणीला यश

मुरमाडी येथील धान खरेदी केंद्र सुरू छ.संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या मागणीला यश

मुरमाडी येथील धान खरेदी केंद्र सुरू छ.संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या मागणीला यश

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी :- दि भगीरथ भात गिरणी मुरमाडी/तुप ता.लाखनी जिल्हा.भंडारा येथील सब एजंट म्हणून शासकीय धान खरेदी दिनांक ०४ डिसेंबर २०२१ पासून बंद पडलेले होते यामुळे शासनाच्या जाजक अटीमुळे २०१९ शेतकऱ्यांची धान खरेदी NEML PORTAL वर ONLINE झालेली आहे.परंतु आतापर्यंत फक्त १८९ शेतकऱ्यांची धान मोजणी झाली होती.उर्वरित शेतकऱ्यांची धान मोजणी केव्हा सुरु होणार हा प्रश्न संपूर्ण शेतकऱ्यांसमोर पडलेला होता धान मोजणी न झाल्यामुळे परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या चिंतेत असून वैतागलेले होते आणि अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत तेव्हा समोरचे व्यवहार धान मोजणी झाली नाही तर शेतकरी आपले आर्थिक व्यवहार कसे करणार हि गंभीर समस्या सर्व शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली होती.तरीपण शासन आणि प्रशासन ह्या गंभीर बाबीकडे जाणीव पूर्वक लक्ष देऊन तात्काळ ०२ जानेवारी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची धान मोजणी सुरु करावी मोजणी सुरु न झाल्यास छ. संभाजी शेतकरी सेवा संघटना व संपूर्ण शेतकऱ्यांच्या माध्यमातून दि. भगीरथ सहकारी भात गिरणी मुरमाडी / तुप ह्या ठिकाणी एक तीव्र जन आंदोलन उभा करून उपोसनावर बसणार तेव्हा ह्या साठी सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील असे ही आव्हान करण्यात आले होते या संदर्भात मा.लाखनी नायब तहसिलदार उरकुडे साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सोपविण्यात आले होते मात्र आता दिनांक 6 जानेवारी 2022 पासून सुरळीतपणे धान खरेदी सुरू करण्यात आली.यामुळे छ.संभाजी शेतकरी सेवा संघटनेचे मागणीला यश प्राप्त झाले आहे.या प्रसंगी छ.संभाजी शेतकरी सेवा संघटना चे जिल्हाअध्यक्ष किशोर मोहतुरे, उपाध्यक्ष विलास शेळके,जिल्हा सचिव शरद वाढई,उपसचिव सचिन चौधरी, जिल्हा संपर्क महेश शिवणकर व इतर पदाधीकारी युवराज मोहतुरे,होमा मोहतुरे,धनराज मोहतुरे व इतर शेतकरी वर्ग देवधन भोयर टोलिराम हुमे बाळू गिरी उपस्थित होते.