
सिद्धांत
९ जानेवारी २०२२: बुधवारी पंजाबमधील कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काही ठिकाणी रास्ता रोको अंदोलन केल्याने पंतप्रधान मोदींना पंजाबमधील फिरोझपूर जिह्यातील एक फ्लायओव्हर वर १५-२० मिनिटे आपल्या ताफ्यासह थांबावे लागले होते. पुढे सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदी आपला पुढील कार्यक्रम रद्द करून माघारी परतले होते.
त्यानंतर पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यादिवशी झालेल्या या घटनेस जबाबदार कोण? याबाबत देशभरात राजकीय आणि शासकीय पातळीवर वादविवाद होते आहेत. मुख्यतः भाजप पक्षाचे नेते यासाठी पंजाब काँग्रेस सरकार आणि पंजाब पोलीस यांना जबाबदार ठरवत असताना, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी मात्र आपली प्रतिक्रिया देताना या आरोपांना धुडकावून लावले आहे.
मी अनेकदा सांगितले आहे कि, पंतप्रधानांना पंजाबमधील दौऱ्याच्यावेळी कोणताही धोका नव्हता. ते पूर्णपणे सुरक्षित होते. काही लोकांकडून पंजाब पोलिसांना बदनाम करण्याची विधान केली जात आहेत, ती पूर्णपणे चुकीची आहेत, असं वृत्तपत्रांना बोलताना त्यांनी सांगितले होते.
त्यादिवशी पंतप्रधानच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती देत ते पुढे म्हणाले कि, त्यादिवशी पंतप्रधान मोदींपासून एक किलोमीटरच्या परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी कोणीही नव्हते. त्यावेळी मार्गावर ६००० पोलिसांचे सुरक्षा दल, गुप्तचर विभाग, आणि पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था पाहणारे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे जवान उपस्थित होते. अशी सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा पंतप्रधानांना कोणता धोका होता?
काही वृत्तसंस्थांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, मोगा- फिरोजपूर महामार्गावरील प्यारेआना गावाजवळील रस्त्यावर ११ वाजता काही भारतीय किसान युनियन संघटनेचे काही शेतकरी जमले होते. परंतु त्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांचा ताफा या रस्त्यावरून जाणार असल्याची याची अजिबात कल्पना नव्हती. त्या शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणारे सुरजीत सिंग फूल यांनी सांगितले कि, पंतप्रधानांचा ताफा अडविण्याची आमची योजना नव्हती.
भाजपचे समर्थक पोहचले पंतप्रधान मोदींपर्यंत.
पंतप्रधानांचा ताफा ज्या फ्लायओव्हरवर थांबला होता, त्या फ्लायओव्हर अलीकडे पंतप्रधान मोदींच्या फिरोझपूर येथे होणाऱ्या सभेसाठी जाणाऱ्या भाजप समर्थकांच्या बसेस देखील थांबलेल्या होत्या. पंतप्रधानांच्या ताफा फ्लायओव्हर असल्याचा अंदाज येताच अनेक भाजप समर्थक पंतप्रधांनाना पाहण्यासाठी ताफ्यातल्या त्यांच्या गाडीपर्यंत येऊन पोहचले होते. त्याबद्दलचे अनेक विडिओ सध्या व्हायरल होत आहे.