समता सैनिक दल शाखेचे उद्घाटन मोरगाव येथे
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512046📱
लाखनी – तालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथे शील, शौर्य, बलिदान, समता, मैत्री, बंधुभाव हे मूलमंत्र जोपासून जीवनाचा उद्धार करणे तसेच स्वतःचे संरक्षण स्वतः करणे हेतू विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली समता सैनिक दलाच्या शाखेचे मंगळवार दि.४ जानेवारी २०२२ रोजी दलाचे मुख्य पदाधिकारी व शेकडो सैनिकांसह गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले
आहे.
कोरोना प्रतिबंधक सूचनांचा काटेकोरपणे आदेश पाडून संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोरगाव येथील नालंदा बुद्ध विहारांमध्ये असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती प्रतिमांना पुष्पमाला वाहून अगरबत्ती, मेणबत्ती लावून तसेच त्रिसरण पंचशील आणि बुद्ध वंदना घेऊन वंदन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९.०० वाजता, ध्वजारोहण व ११.०० वाजता पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम लेझीम, नृत्य, भीम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.
दुपारी २.०० वाजता मार्गदर्शनपर भाषणे आणि सायंकाळी ४.०० वाजता स्नेहभोजन, रात्री ७.३० वाजता भीम गीतांचा रंगारंग सांस्कृतिक रजनी कार्यक्रम घेण्यात आला. मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी अनेक वक्तयांनी विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी बहुजन समाजाच्या उद्धाराकरिता प्रज्ञा, शील, करुणा, संस्कार, प्रेम, मैत्री, प्रस्थापित केली आहे. त्याचे प्रत्येक मानवाने अंगीकार करावे. अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाचे पाईक व्हावे यावर सुद्धा अनेकांनी प्रकाश टाकला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र प्रत्येक नागरिकांनी जोपासून सामाजिक बांधिलकी अवलंबावी असे जाहीर आव्हान करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटक समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा कोचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय महिला प्रमुख प्राध्यापिका वासंती सरदार, कार्यक्रमाचे मार्गदर्शक समता सैनिक दलाचे राष्ट्रीय स्टॉप ऑफिसर गजेंद्र गजभिये, तालुकाप्रमुख भंडारा श्रीराम बोरकर, तालुका बौद्धिक प्रमुख समता सैनिक दल भंडारा सी. डी. गवरे, जिल्हा प्रमुख समता सैनिक दल आर.सी. फुल्लुके, लाखनी तालुका प्रमुख मारोती करवांडे, पालांदूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख समता सैनिक दल दिलीप बडोले, संघटक जिल्हा भंडारा समता सैनिक दल प्राध्यापक युवराज खोब्रागडे, सरपंचा मोरगाव सुरेखा पारधीकर, उपसरपंच गणेश टेकाम, पोलीस पाटील सुरेश राऊत, सरपंच राजेगाव मीनाक्षी बोपचे, प्राध्यापक आदिवासी शिव विद्यालय राजेगाव अशोक चेटुले, याबरोबरच क्षेत्रातील अनेक राजकीय पदाधिकारी व संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्य
सहकारी माजी सरपंच नाजूक भैसारे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिमा उमेश भैसारे तर संचालन मनीषा जांभुळकर व मंगेश भैसारे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गावातील युवक, महिला, प्रौढ व्यक्तीसह विद्यार्थ्यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले आहे.