जालना भोकरदन तालुक्यात कोरोना साहित्य वाटप.

61

जालना भोकरदन तालुक्यात कोरोना साहित्य वाटप.

प्रदिप शिंदे प्रतिनिधी

जालना:- भोकरदन तालुक्यातील प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कुंभारी गावातील ग्राम पंचायत समिती सदस्य व बालमित्र, गाव बाल संरक्षण समिती सदस्य तसेच अंगणवाडी सेविका यांना सॅक्रेड व युनिसेफ संस्थेच्या माध्यमातून कोरोना साहित्य वाटप करण्यात आले आहे त्यामध्ये कोरोना पासुन रक्षण व्हावे यासाठी मास लोकांना देण्यात आले. या कोरोनाच्या परिस्थितीत आपण लोकांना मदत करावी हि भावना जागृत करण्यासाठी कोविड योध्दा संबोधित टोपी चे वितरण या ठिकाणी करण्यात आले. आपण सर्व सदस्य जबाबदारी ने मुलांच्या सुरक्षितते साठी प्रयत्न करुन मुलांच्या हक्का बाबत सदस्यांना माहिती देण्यात आली. यावेळी तालुका समन्वयक सुनिल ससाने यांनी सर्व समिती सदस्य यांना कोविड सुरक्षा बाबत व या परिस्थितीत गावातील मुलांचे प्रश्न या विषयावर चर्चा केली.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच रवींद्र साळवे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कृष्ण मुरकुटे प्रदीप शिंदे व समन्वयक रामेश्वर राऊत अनिल जाधव बालमित्र शिवाजी थोरात दिलीप सहाने हे उपस्थित होते