वाढोणा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी
दोन दिवशीय कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा,सत्कार,बक्षीस वितरण आदी कार्यक्र
✍राजेश बारसागडे
तळोधी (बा.)अप्पर तालुका प्रतिनिधी
तळोधी (बा.) :- नागभीड तालुक्यातील
वाढोणा येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा 65 व्या पुण्यस्मरण सोहळा बुधवार ,गुरवारला असा दोन दिवसीय कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात बुधवारला सकाळी ग्रामस्वछता करण्यात आली असून त्यानंतर ध्यान साधना करण्यात आली.दुपारच्या सुमारास रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सायंकाळी सामूदायिक प्रार्थना करण्यात आले. सायंकाळी ह.भ.प. केशवदास भोंडे यांच्या किर्तनाचा भाविकांनी आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी गुरुवारला सकाळी सामूधायिक ध्यान, प्रार्थना, व संपूर्ण गावातून रामधून काढण्यात आली.यामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.पालखीत संत तुकड्यादास महिला भजन मंडळ, गुरुदेव सेवा भजन मंडळ, मंजुळा माता महिला भजन मंडळाच्या सदस्यांनी संगित साथ दिली. रामधुन वर ह.भ. प. केशवदास भोंडे महाराजांनी मार्गदर्शन केले .दुपारी 3 वाजता रांगोळी स्पर्धा च्या बक्षीस वितरण,सत्काराचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच देवंद्र गेडाम, गुरुदेव मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रा.प. सदस्य अनिल डोर्लीकर. ग्रा. प.सदस्य प्रदीप येसन सुरे, माजी सरपंच विनोद आंबोरकर बाबाजी भिमनवार, ग्रा.प. वासुदेव मस्के, विनोद बोरकर, बाबुराव येसनसुरे,ग्रा.प. सदस्यां मंगला बोरकर,रेश्मा सडमाके, पत्रकार सुभाष गजभे, ह.भ.प. सुनंदा बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान रांगोळी स्पर्धकांना रोख बक्षीस देण्यात आले.यानंतर सौ.सुनंदा बोरकर यांच्या कीर्तनचा कार्यक्रम पार पडला. त्यांना गावातील पुरुष भजन मंडळ व महिला भजन मंडळानी संगित साथ दिली. त्यानंतर संपूर्ण गावाचा सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष अनिल डोर्लीकर, सचिव मल्ला कन्नावार, मुखरू मस्के, विठ्ठल गजभे, भिकाजी आत्राम, गुलाब आत्राम, तुकाराम मदनकर, कार्तिक सोनवाणे, छत्रपती बोरकर, चंदा बावणे, वनिता गजभे, सिंधू येसनसुरे, रेखा कावळे, गजानन बोरकर, भास्कर बोरकर,आकाश कामडी, सजनपवार,आणी गावातील सर्व गुरुदेव भक्तांनी सहकार्य केले.