सिएफयल सेंटर कार्यालयाला मा.हनुमा कुमारी जी (A.G.M.) आर.बी.आय. नागपूर प्रत्येक्षपने भेट
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:-गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील सिएफयल सेंटर देवरी कार्यालयात मा.हनुमा कुमारी जी (A.G.M.) आर.बी.आय. नागपूर & मा.गणवीर सर जी (R.S.E.T.) गोंदिया यांनी प्रत्येक्षपने भेट देऊन सिएफयल सेंटर कार्यालय बघीतले. लगेच सिएफयल सेंटर चे सी.एम.मा.महेश कुमार सुरसाऊत सरांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे सुस्वागत कले.तसेच तालुका समन्वयक विशेष करवाडे देवरी ब्लाक,तालुका समन्वयक तुशार ठाकुर सालेकसा ब्लाक, तालुका समन्वयक शंकरजी पाटनकर अर्जुनी/मोर.जिल्हा गोंदिया या सर्वानी पाहुण्यांचे अभिनंदन करून सुस्वागत केले.
पुढील कार्यक्रम घेण्यासाठी भागी गावात जाऊन ग्रा.पं.सदस्य सौ.मयुरी पंकज अम्रुतकर यांच्या घरी WAC कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत . या कार्यक्रमाचे सुत्र संचालन तालुका समन्वयक विशेष करवाडे यांनी केले.गावातील जनतेला बँकेच्या, पोष्टाच्या अनेक शासकीय योजना बद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
मा.हनुमा कुमारी जी(A.G.M.) आर. बी.आय. नागपूर यांनी गावातील महिला बचत गटांना बँक विमा, बँक बचत,नियमित बचत करुन आपला आर्थिक स्तर वाढविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तर मा.गणवीर सर (R.S.E.T.) गोंदिया यांनी मुलींच्या उजवल भविष्या करीता सुकन्या योजना बद्दल सविस्तर माहिती दिली. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.महेशकुमार सुरसाऊत (सेंटर मँनेजर) सिएफयल सेंटर देवरी यांनी केले व कार्यक्रमाचे समारोप झाला.