सोशल फोरम तर्फे समाजसेविका सिंधूताईंना आदरांजली

सोशल फोरम तर्फे समाजसेविका सिंधूताईंना आदरांजली

सोशल फोरम तर्फे समाजसेविका सिंधूताईंना आदरांजली

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/साकोली :- अनाथांची माय म्हणून सुपरिचित असलेल्या सिंधूताई सपकाळ ४ जानेवारी रोजी दिवंगत झाल्या. त्यांच्या अनाथ मुलांसाठी केलेल्या भरीव योगदानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम लाखनी व साकोली तालुक्याचे वतीने जान ठेऊन बौद्ध धम्म ध्वज दिनाचे औचित्य साधून त्यांना आदरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम , प्रमुख अतिथी प्रसिद्धी प्रमुख कालिदास खोब्रागडे , सोशल फोरम लाखनी तालुका अध्यक्ष अरविंद रामटेके , साकोली तालुका अध्यक्ष किशोर तरजुले , भालेराव सर , ओबीसी आघाडी अध्यक्ष सुरेश मेश्राम , युवा आघाडी अध्यक्ष सोनू राऊत , सामाजिक कार्यकर्त्या ॲड. स्मिता मेश्राम , अरविंद कठाने , भंडारा तालुका ओबीसी आघाडी अध्यक्ष मधुकर देशमुख , विजय साखरे , देवा इलमकर , प्रमोद शिंगाडे , दीपक साखरे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा महासचिव कैलास गेडाम , अरविंद रामटेके आणि ॲड. स्मिता मेश्राम यांनी समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास व आलेल्या परिस्थितीला कसे सामोरे गेल्या याबाबद सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत मेश्राम , संचलन विजय साखरे तर आभार अनमोल लोणारे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी विकास मेश्राम , धम्मदीप कोल्हे , साहिल खोब्रागडे , सुधाकर मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.