माजी आमदार चरण वाघमारे यांच्या जन्मदिन उत्साहात साजरा

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या जन्मदिन उत्साहात साजरा

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या जन्मदिन उत्साहात साजरा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा : पूर्व श्रमीचे शिवसैनिक तुमसर व मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चरणभाऊ वाघमारे यांना वाढदिवसानिमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री येथे १९९८ साली भेट घेतल्याचे जुन्या आठवणींना उजाळा देत छायाचित्र भेट दिली तसेच जन्मदिनाच्या पुष्पगुच्छ देऊन उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, प्रवीण कहालकर, विकास फाउंडेशनचे ललित शुक्ला, भालचंद्र बोन्द्रे, पंकज ठाकूर, विजय भुरे, सुशांत देशमुख, सागर बिसने, अविनाश उपरिकर, सुलभा हटवार, करुणा कुकडे सह पदाधिकारी उपस्थित होते.