बोरगाव मंजू महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार !

56

बोरगाव मंजू महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार !


सिद्धार्थ पाटील प्रतिनिधी
बोरगाव मंजू:- पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणीरंभापुर नजीक ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली, या अपघातात एक ठार झाला, ही घटना बुधवारी रोजी घडली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन राजु मेश्राम वय ३८ यवतमाळ हे आपल्या दुचाकी क्रंमाक एम.एच.२८ बी .सी.७४०३ जात होते, दरम्यान ट्रक क्रमांक एम.एच.४० एके.९७६५ या ट्रक ने मोटारसायकल वरून जाणार्या सचिन मेश्राम यांना धडक दिल्याने अपघातात सचिन मेश्राम घटना स्थळावरच मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. आहेत पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत