समर्थ विद्यालयाच्या एन सी सी कॅडेट चे सायकल वरून जनजागृती अभियान

47

समर्थ विद्यालयाच्या एन सी सी कॅडेट चे सायकल वरून जनजागृती अभियान

समर्थ विद्यालयाच्या एन सी सी कॅडेट चे सायकल वरून जनजागृती अभियान

 

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी अंतर्गत समर्थ विद्यालय लाखनी येथील 4 महाराष्ट्र बटालियन या एन सी सी छात्रसैनिकांचे सामाजिक प्रबोधन पर सायकल जनजागृती अभियान राबविण्यात आला.
या अभियानामध्ये एन सी सी अधिकारी लेफ्टिनंट प्रदिप लिचडे यांच्या नेतृत्वात ४५ छात्रसैनिकांनी रेंगोळा आणि केसलवाडा या गावामधील जनतेला एड्स जनजागृती, कोरोना जागतिक महामारी प्रतिबंध आणि उपचार, मुलींचे लग्नाचे परिपक्वता वय २१, यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधन केले.
छात्रसैनिकांमध्ये साहसी प्रवृत्ती आणि नेतृत्व क्षमता विकासासाठी मांगली बांध येथे छात्रसैनिकांनी वेगवेगळे साहसी उपक्रमाचे धडे गिरवले. यामध्ये गिर्यारोहण ,रॉक क्लाइंबिंग, रोप क्लाइंबिंग, रोप ट्री क्लाइंबिंग यांसारखे प्रात्याक्षिक केले. या अभियानाअंतर्गत छात्र सैनिकांनी मांगलीबांध येथे स्वच्छता अभियान, प्रदूषण नियंत्रण तसेच सामुहिक वनभोजन, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबविले. या आयोजनाप्रसंगी पुढील शैक्षणिक वर्षांसाठी एन सी सी रँक लीडर चे चयन सुद्धा करण्यात आले यात अथर्व सारवे हा पुढील वर्षातील सर्जेन्ट तर रिचा महादूले आणि अक्षरा आगाशे ह्यांना लेडी सर्जेन्ट म्हणून नियुक्त करण्यात आले.
या अभियानाला राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी चे अध्यक्ष श्री आल्हाद भांडारकर तसेच जेष्ठ संस्था सदस्य श्री मधुकर लाड ह्यांनी शुभेच्छा दिल्या. तर समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अभय भदाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅली ला प्रस्थान केले
या साहसी उपक्रमाला समर्थ विद्यालयाचे शिक्षक श्री अक्षय मासुरकर, श्री रुपचंद मखरे श्री भुपेंद्र वाघाये यांचे मार्गदर्शन लाभले तर एन सी सी कॅडेट मासुम रहांगडाले, राज कलचुरी, दिपम ठाकरे यांनी परिश्रम घेतले तर संपूर्ण अभिमान एन सी सी अधिकारी लेफ्टनंट प्रदीप लिचडे, सर्जेन्ट दुर्गेश टांगले लेडी सर्जेन्ट पूजा लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.