खमाटा येथे दंडारीचा कार्यक्रम थाटात संपन्न
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर बैनगंगा नदीच्या खोन्यात वसलेल्या समाटा (टाकळी) येथे जलसा निमित्त सांस्कृतिक दंडारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जलसा कार्यक्रमानिमित्त आयोजित सांस्कृतिक दंडारीचे उद्घाटन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विष्णुदास लोणारे हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक कोठीराम पवनकर, सेवकराम नागफासे, पुरूषोत्तम गायधने,महेंद्र जगनाडे, जितेंद्र लांबट, मोहन गायधने, केशव राधोते उपस्थित होते. यावेळी कोरोना आणि
ओमिक्रॉन या आजाराची साथ वादू नये म्हणून प्रत्येकांनी मास्क बांधाये
स्वतः मध्ये अंतर ठेवाये साबणाने हात धुवावे वेळोवेळी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे. स्वतः आणि समाजातील घटकाचे जीव वाचवावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणातून विष्णुदास लोणारे यांनी केले. शेतीच्या सतत
नापिकीमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल कोठीराम पवनकर यांनी आपले मत व्यक्त
चंद्रशेखर भिवगडे यांनी गोसे धरणाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे असे मत मांडले. जलसा कार्यक्रमात सांस्कृतिक दंडारीचे सादरीकरण बालगणेश सुभान मंडळाचे शाहीर संदीप सार्वे व त्यांच्या कलाकारांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी योगेश गायधने, जयंता आस्वले, राधेश्याम आस्वले, राजकुमार रापोत, बबलु गायधने, रूपचंद पवनकर, लिलाधर पवनकर, राकेश आस्वले, प्रविण भोपे, यशव’त बापाये, रंजित भेदे, तसेच गावक-यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रविण भोपे यानी केले तर आभार योगेश गायधने यांनी मानले.