कोरोणाच्या आड शिक्षणावर हल्ला , सरकार चा दारुवर गल्ला : अश्विन मेश्राम
वंचित बहुजन आघाड़ी
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:-अनेक वर्षापासुन रोजगार निर्माण होत नसल्याने एका पीढीचे फार मोठे नुकसान झाले तरुन आधीच त्रस्त झालेला आहे
दोन वर्षापासुन कोरोणा च्या नावाखाली शिक्षणाचा बट्याबोळ झालेला आहे
जानेवारी आली की करोणा येतो आँगस्ट – आँक्टो पर्यत राहतो हिवाळा सुरू झाला की रूग्ण संख्या कुठल्याच मिडीया द्वारे सांगीतली जात नाही उलट कुठल्या टेस्ट होत नाही बहुतांश कोरोणा सेंटरसुद्धा बंद केले जातात हिवाळा संपत नाही तोच कोरोणा येतो टेस्ट सुरु होतात सेंटर सुरु केले जातात रूग्णाची संख्या दाखवली जाते त्यानंतर पुन्हा सरकार द्वारे देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणा-या शिक्षणाची दारे बंद केली जात आहे
एकंदर परीस्थितीत करोणा सरकार ला सांगुन तर येत नाही हा प्रश्ण सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे
शाळा , महाविद्यालय कोरोणाच्या भितीने बंद केली तर आँनलाईन शिक्षण सुरु केले तडजोड करीत पालकांनी मुलांना मोबाइल घेउन दिले ज्यामधुन मोबाइल ची विक्री झाली रिचार्ज चे किमंत वाढली ती सुध्दा मुकाट्याने मुलांनी सहन केली परंतु आँनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाचा बट्याबोळ झालेला अवस्थेत आहे
सर्वसामान्य व्यक्ति मुलाला ट्युशन लावु शकत नाही तर शाळा ,विद्यालय सरकार नी बंद करीत सर्वसामान्याच्या मुलांना प्रशासकीय या कुठलाही रोजगार उपलब्ध होणार नाही अशी व्यवस्था सरकार करीत शिक्षणावर हल्ला करीत आहे तर शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्ण मुलांना ,व पालकांना पडलेला आहे
एकीकडे शाळा , विद्यालय सुरु राहील्यास कोरोणाच संक्रमन वाढेल या भितीने सरकार ने शिक्षण बंद केले परंतू दारूच्या दुकानामध्ये रोज लोक जातात व घरच्या इतर लोकांच्या संपर्कात येतात त्यावर मात्र निर्बंध न लावता सर्रास पने दारुची दुकाने सुरू ठेवण्याच काम सरकार ने केले आहे
दारूच्या दुकानाच्या माध्यमातुन जिवीत हानी आणि कोरोणा संसर्गाची पर्वा न करीत उलट सरकार शिक्षणावर होणारा खर्च वाचवित दारुतील कराच्या माध्यमातुन करोडो रुपयाचा गल्ला जमा करण्याचे काम करीत आहे.
शिक्षण बंद केल्यामुळे येणा-या काळात रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्याकडे शैक्षणिक योग्यता राहणार नाही बेकारी वाढेल विद्यार्थ्थाचे नुकसान होईल हे आपल्या डोळ्यासामोर होत असतांना नाकर्तेपणाची भूमीका टाळीत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जागृत होउन शाळा ,विद्यालय सुरु करण्याची मागणी करावी असे वंचित बहुजन आघाड़ी जिल्हा चंद्रपूर कार्यकारणी सदस्य अश्विन मेश्राम यांनी आवाहन केले