सासरच्या छळास कंटाळून महिलेचा गळफास.
धायरी;- सासरच्या छळास कंटाळून महिलेचा गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. लग्नानंतर दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करुन वेळोवेळी महिलेशी भांडणामुळे तिने छळास कंटाळून गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना तीन दिवसांपुर्वी धायरीतील मुक्ताई इमारतीत घडली.
अनुसया सज्जन मोरे वय 21 असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सज्जन मोरे आणि इतर दोनजणांविरुद्ध सिंंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू तोरगल्ले वय 40, रा. वडगाव शेरी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसया आणि सज्जन यांचे जानेवारी 2019 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सज्जन आणि इतर दोघांनी दुचाकीसाठी अनुसयाला माहेरहून 1 लाख रुपये आणण्याची मागणी केली. किरकोळ कारणावरुन अनुसयाला शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला. त्यामुळे छळास कंटाळून अनुसयाने 1 नोव्हेंबरला राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे तपास करीत आहेत.