अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहण्याचे आदेश

45

अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहण्याचे आदेश

अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहण्याचे आदेश

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी /भंडारा :- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यात बऱ्याच अंशी नागपूर आणि अन्य जिल्हयातून ये-जा करणान्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. अशा अधिकारी आणि कर्मचान्यावर अंकुश लावण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून सर्वांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आदेशाचे उलंघन करून ये-जा करताना आढळालेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांवर व त्यांच्या विभाग प्रमुखांवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी कार्यालयातून काढलेल्या आदेश आतुन देण्यात आले आहेत.
भंडारा जिल्हयात मोठ्या प्रमाणावर नागपूर आणि अन्य जिल्ह्यातून अधिकारी व कर्मचारी
येतात. नियमित ये-जा करणाऱ्या
अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे कोणाचा संसर्ग वाढत असल्याची भीती जिल्हा प्रशासनाला आहे. सध्या नागपूर जिल्यात रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचा-यांच्या ये-जा करणे यामुळे भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लोक जिल्हयातील संसर्ग बाबीच्या दृष्टीने कारणीभूत ठरू नयेत यासाठी अशा सर्व अधिकारी व कर्मचान्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहावे. कुणीही नियमांचे उलंघन करताना दिसल्यास व त्याच्यामुळे कोरोना संसर्ग वाचत असल्याचे लक्षात आल्यास अशा विभागाच्या कार्यालय प्रमुखावर व संबंधित अधिकारी अथवा कर्मचान्यांवर जबाबदारी निश्चित करून भारतीय दंड विधान कलम १८८६ आपत्ती व्यवस्दापन कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत या आदेशात देण्यात आले आहेत. नागपूर गोंदिया जवळ असल्याने अध्यापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी जिल्हयात नियमित ये-जा करतात.आता त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.