लहानपण देगा देवा!!! "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार "

लहानपण देगा देवा!!!

“लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार “

लहानपण देगा देवा!!! "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार "

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.7666739067

संत तुकाराम महराजांचे हे अमृतबोल आपल्या कानांना नेहमीच तृप्त करत असतात. मोठेपणा म्हणजे हे त्यांच्या ज्ञानकोषात जणू वगळलेस असावे. उगाच मोठेपणाचा देखावा करण्यापेक्षा लहानपण कधीही श्रेष्ठ. महाराजांनी म्हटलंय की, ज्याच्या अंगी मोठेपणा असतो त्याला असह्य यातना सहन कराव्या लागतात. नको तीथे मोठेपणा गाजवला की आहे तेवढा सम्मान धुरीस मिसळतो. आपले काम आपण चोखपणे बजावत राहायचे कोणत्याही प्रकरचा धिंगाणा न घालता. लहानपण घेऊन साऱ्यात सामावलेल कधीही उत्तम. उगाच मोठेपणा मिरवीत बसने आणि स्वतःला आपल्या लोकांपासून लांबवणे हे केव्हाही गोचित आणणारे मोठेपण असतं. म्हणून आपण नेहमीच स्वतःला नम्रपनाचं पांघरूण घालुन गर्विष्ठ मोठेपणा धिकारून लावूया.
महाराजांनी म्हटलेय,” जया अंगी मोठेपण , तया यातना कठीण ” मोठेपणा मुळे उदमतपणा येतो, गर्विष्ठपणा येतो आणि हे सगळं आलं की, आपल्यातली निरागसता नाहीशी होऊ लागते . पाहावं तेवढे सोपे नाही लहणपन जगणं आणि वागणं. मी मोठा, मी ज्ञानी, मी विद्वान , मी श्रेष्ठ असं झालं की समजा आपल्या यशाला पूर्णविराम लागला. म्हणून आपल्या यशात असो प्रगतीच्या वाटेवर असो किंवा कुठल्याही बाबतीत असो कधीच मीपणा किंवा स्वतःचा मोठेपणा गाजवू नये. जसा मोगऱ्याचा, चंदनाचा सुगंध चहूकडे दरवळतो त्याला सांगावं नाही लागत की हा सुगंध माझा आहे अगदी तसच चांगल्या कामाची, चांगल्या विचारांची, चांगल्या माणसांची दखल नेहमीच घेतली जाते.
विद्या, कला, साहित्य, ह्यासारख्या कुठल्याही क्षेत्रात कितीही ज्ञान, कितीही यश आलं तरी माणसाने गर्व करू नये. आपले पाय नेहमीच जमिनीशी जुळलेले राहायला हवे. मोठेपणा गाजवणारी माणसं संकटाच्या एखाद दोन फटक्यांनी कोलमळून पडतात. पन नम्रपणे आणि साधी माणसे नेहमीच स्वतः खमकी राहतातच पण इतरांना देखील धीर आणि आधार देतात.
म्हणून प्रत्येक वेळी विनयशील आणि स्वतःला नम्र करा कोणी कितीही मोठेपणाचा गाजावाजा केला तरी आपण नेहमी लहानपण घट्ट धरून विनयशील तेणे त्यांचा मोठेपणा स्वीकारावा.

“नकोच तो मोठेपणा
खस्ता मिळतील यातनांच्या
भाग्या विनवीतसे लहणपण
रामबाण तो आतल्या वेदनांचा” ||

आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठी उंची गाठली, तरी कधीही स्वतःच्या मनावर आणि गर्वाचा गंज लागू न देता स्वतःस विनयशीलते कडे वळवुन लहणपन आत्मसात करणे गरजेचं आहे. आयुष्यात नेहमीच यशाच्या शिखरावर चढावे पण त्याच सोबत एक संस्कार मात्र आपल्या गाठीशी असावा तो म्हणजे विनयशीलता.

“जरी अंगी असली विनयशीलता ,
तेव्हाच उजळे निरागस हा चेहरा”

*-भाग्यश्री हिरे रुले, ठाणे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here