कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय- डॉ दीप्ती सुर्यवंशी

46

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय- डॉ दीप्ती सुर्यवंशी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय- डॉ दीप्ती सुर्यवंशी

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-तालुक्यातील सर्व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कोविड लसीकरण आणि तिसर्‍या लाटे साठी करावयाच्या उपाययोजना यासाठी बैठक उपविभागीय अधिकारी मा. डॉ दीप्ती सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली. या सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, सर्व व्यापारी आस्थापना यांनी आपल्या कडील सर्व कर्मचारी यांनी लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या असाव्यात, दोन्ही डोस घेतलेल्या ग्राहकाला सेवा पुरवावेत. मास्क, सॅनीटायझर, सामाजिक अंतर याचे पालन करावे. या सभेत श्री संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर, श्री उमेश पाटील पोलिस निरीक्षक, डॉ. बानोत अध्यक्ष बल्लारपूर मेडिकल असोसिएशन यांनीही कोविड च्या तिसर्‍या लाटे साठी करावयाच्या उपाययोजना बद्दल माहिती दिली. श्री सतिश साळवे नायब तहसीलदार, श्री नरेश मुंधडा श्री राजू मुंधडा, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन, श्री चौकसे अध्यक्ष मेडिकल शॉप असोसिएशन, श्री बुच्चय्या अध्यक्ष न्हावी संघटना, श्री हेमंत मानकर स्वत धान्य दुकान संघटना, ईत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.