१४ ते २८ जानेवारी दरम्यान साजरा होणार माय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
१४ ते २८ जानेवारी दरम्यान साजरा होणार माय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मीडिया वार्ता टीम
१४ जानेवारी २०२२: ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून मराठीच्या वैविध्यपूर्ण पैलूंवर आधारित ट्विटर मोहीम, लघुपट प्रक्षेपण आणि मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानांचे पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाच्या निर्देशांनुसार १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते. तसेच व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी आणि वाचन, भाषा आणि जीवन यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

विशेष ट्विटर मोहीम आणि लघुपट प्रसारण

१४ जानेवारीपासूनच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या मराठी ट्विटर हँडलवर मराठी खाद्य संस्कृती,सांस्कृतिक वारसा, साहित्य -नृत्य -वस्त्र-आभूषण आदि परंपरांच्या माहितीवर आधारित विशेष ट्विटर मोहीम राबविण्यात येणार आहे. मराठीसह परिचय केंद्राच्या हिंदी व इंग्रजी ट्विटर हँडलवरही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच परिचय केंद्राच्या सर्वच समाजमाध्यमांवर १६ जानेवारी रोजी ‘शांतता! मराठीच कोर्ट चालू आहे’ या लघुपटाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

समाजमाध्यमांवरुन लघुपट प्रसारण व व्याख्यानांचे पुन: प्रसारण

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त एक लघुपट आणि पाच व्याख्यानांच्या पुन: प्रसारणाची वेळ दुपारी ४ वाजताची राहील. परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युटयूब चॅनेलहून प्रसारण होणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.

भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा – 2022 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 14 जानेवारी :साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा लेखकांशी संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी हे आहेत. या कार्यक्रमात श्री.प्रणव सखदेव (कथाकार), श्रीमती सोनाली नवांगुळ (अनुवादक), रवी कोरडे (कवी), संजय वाघ, बाल साहित्यिक, सहभागी होणार आहेत या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक या असतील, प्रास्ताविक नामदेव कोळी, आणि सूत्रसंचालन -डॉ.महादेव डिसले करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते दु.1 या दरम्यान होणार आहे.

दि. 17 जानेवारी: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यवरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष महेश दत्तात्रय लोंढे असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.

दि. 18 जानेवारी: आभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का? याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते – अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन – प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक – भारत जाधव करणार आहेत.

दि. 19 जानेवारी :आभासी व्याख्यान – मी काय वाचतो?या विषयावर वक्ते नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक – भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here