नांदेड येथील अरुणभाऊ झाडे विद्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
✍राजेश बारसागडे
तळोधी बा.अप्पर तालुका प्रतिनिधी
8830961332
तळोधी(बा.) :- नागभीड तालुक्यातील नांदेड येथील अरुणभाऊ झाडे विद्यालयात बुधवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती ‘युवा दिन’ म्हणून तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरविंद राऊत, प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डी. एल. मसराम,बी. एच. रामटेके यांनी सहकार्य केले.