वाढोणा येथे सरस्वती बचत गटाच्या महिलांचा प्रेरणात्मक मसाला उद्योग प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार.

54

वाढोणा येथे सरस्वती बचत गटाच्या महिलांचा प्रेरणात्मक मसाला उद्योग

प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार.

वाढोणा येथे सरस्वती बचत गटाच्या महिलांचा प्रेरणात्मक मसाला उद्योग प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार.

✍राजेश बारसागडे
तळोधी (बा.)अप्पर तालुका प्रतिनिधी
8830961332

तळोधी (बा.):-नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील सरस्वती महिला बचत गटाच्या महिलांनी ‘सरस्वती मसाला उद्योग’ स्थापन करून इतर महिलांना प्रेरणात्मक संदेश दिला आहे. या उपक्रमाचा उदघाट्न सोहळा वाढोणा येथे नुकताच पार पडला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नागभीड अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेद्वारा सरस्वती महिला बचत गटास आर्थिक सहायता व प्रोत्साहन देण्यात आले.दरम्यान वाढोणा येथील सरस्वती महिला स्वयं सहायता समूहाला महिलांची आर्थिक उन्नती व्हावी तसेच त्यांच्या उपजीविकेत वृद्धी होऊन कुटुंबाचा स्तर उंचावावा या उदेशाने शासनातर्फे व्यवसाय करण्याकरिता 4 लक्ष रुपयांचा निधी दिल्या गेला आहे.त्या माध्यमातून महिला व्यवसायिक बनल्या.दरम्यान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजिका व्हाव्या या करिता आर्थिक पाठबळ दिल्या गेला. आणि सरस्वती समूहातील महिलांनी मसाले व्यवसाय करण्याचा दृढ निश्चय करून व्यवसाय सुरु केला. “सरस्वती मसाले उद्योग” असे सदर उद्योगाचे नाव ठेवण्यात आले.
या मसाला उद्योगाचे उदघाट्न नागभीड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच देवेंद्र गेडाम यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच भगवान बसोड, ग्रा.प. सदस्या, मंगला बोरकर, रेश्मा सडमाके, मीनाक्षी कोमावार, तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम, उद्यान प्रभाग संघाच्या अध्यक्ष सुषमा डोर्लीकर,सचिव शारदा बोरकर यांची उपस्थिती होती. दरम्यान नागभीड गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांनी सदर समूहातील उद्योगिनी महिलांना शुभेच्छा दिल्या व इतर समूहांना उद्योजक होण्यासदर्भात महिला उद्योजिकांच्या विविध वस्तूंना तालुकास्तरावर मार्केटिंग साठी ‘राणी हिराई तालुका विक्री केंद्रा’ची स्थापना करण्यात आली. या बाबतीत कोणतीही गरज भासल्यास मी सदैव आपल्या मदतीला तयार आहे अशी खोचरे यांनी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन तालुका व्यवस्थापक अमोल मोडक व प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम यांनी केले. तर आभार सरस्वती समूहाच्या सदस्या संगिता गहाणे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तालुका व्यवस्थापक आमिर खाँन, प्रभाग समन्वयक दिपक गायकवाड,गजानन गोहणे,समूह संसाधन व्यक्ती साधना बोरकर, मंगला बोरकर, कृषी सखी रागिनी बोरुले व मत्स्य सखी वृषाली शेंडे यांनी सहकार्य केले.