महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन
विशाल सुरवाडे
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
मो.9595329191
जळगांव- महाराष्ट्र पोलीस बॉईज ही पोलीस व पोलीस कुटुंबासाठी तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रामध्ये काम करणारी एकमेव अ राजकीय संघटना आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने अत्यंत उपयुक्त माहिती, तिथी, आणि उत्कृष्ट सजावटीसह २०२२ दिनदर्शीका प्रकाशीत केली आहे. या दिनदर्शीकेचे जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दिनदर्शिका सप्रेम भेट देण्यात आली. त्यावेळी त्यांनी बारकाईने संपूर्ण वाचन करून राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. सर्वसामान्य वाचकांना भावेल अशा उत्कृष्ट सजावटीसह सर्व सण, तिथी, पोलीस पाल्यांची वाढदिवस, पोलीस संघटनेच्या वतीने केलेली कार्य आदी उपयुक्त माहिती या दिनदर्शीकेत समाविष्ट आहे. प्रसंगी संघटनेचे संपर्कप्रमुख कुणाल मोरे, जनसंपर्क अधिकारी चेतन निंबोळकर, उप संपर्कप्रमुख अमित बच्छाव, जिल्हाध्यक्ष राकेश कुमार कांबळे, कार्याध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष आरिफ पिंजारी, भूषण सुरडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.