संत चोखामेळा यांना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले अभिवादन
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
बुलडाणा : – थोर संत चोखामेळा यांचा 754 वा जन्मोत्सव सोहळ्याचे आज 14 जानेवारी रोजी साध्या पद्धतीने मेहुणा राजा ता. दे. राजा येथे आयोजन करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळत त्यांचे जन्मस्थळी त्यांच्या मूर्तीचे पूजन करीत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अभिवादन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. मेहुणा राजा विकासाबद्दल आपण कटिबद्ध असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडून लवकरच विकास निधी प्राप्त करून विकास केला जाईल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.